VIDEO : स्कूटीवर एक दोन नाही तर 5 मुलींना बसवून बाहेर पडला, पाहा पुढे काय झालं

VIDEO : स्कूटीवर एक दोन नाही तर 5 मुलींना बसवून बाहेर पडला, पाहा पुढे काय झालं

एखाद्या गाडीवर दोन जण असतील तर तिसऱा व्यक्ती कसाबसा त्यावर बसतो. पण आता एका गाडीवरून सहाजण प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : कोरोना व्हायरसचा धुमाकूळ जगभर सुरू आहे. भारतात रविवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून सर्व प्रवाशी रेल्वे थांबवण्यात येणार आहेत. 31 मार्च पर्यंत रेल्वेसेवा बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच लोकांना घरातच राहण्यास सांगितलं आहे. अत्यंत महत्वाचं काम असेल तरच घरातून बाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे. बाहेर फिरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि इतरांपासून दूर रहावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 5 महिलांना एका स्कूटीवरून नेत आहे. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनमधली असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्कूटरवर तब्बल 6 लोक बसल्याचं दिसत आहे. त्यांनी मास्कही लावलेला नाही आणि सोशल डिस्टंसिंगचं पालनही केलेलं नाही.

संबंधित व्यक्तीला एकाच गाडीवरून 6 जण जाणं महागात पडलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावर व्यक्तीने सांगितलं की, गाडीवर बसलेल्या सर्व महिला आइस्क्रीम शॉपमध्ये काम करतात. त्यांनी लिफ्ट मागितली होती. पोलिसांनी त्या 5 महिलांनाही अटक केली आहे.

भारतात कोरोनाव्हायरस वेगाने पसरतो आहे. काल फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत.

हे वाचा : कोरोनाची भीती, बकऱ्यांनीही घातले मास्क, tiktok video viral

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2020 04:02 PM IST

ताज्या बातम्या