मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /VIDEO: राष्ट्रगीत सुरू असताना केलेल्या त्या कृत्यामुळे विराट कोहली पुन्हा अडचणीत, नेमकं काय घडलं?

VIDEO: राष्ट्रगीत सुरू असताना केलेल्या त्या कृत्यामुळे विराट कोहली पुन्हा अडचणीत, नेमकं काय घडलं?

सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत (National Anthem) वाजवण्यात आल्याने यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. यादरम्यान विराट कोहली च्युईंगगम चघळताना दिसला

सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत (National Anthem) वाजवण्यात आल्याने यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. यादरम्यान विराट कोहली च्युईंगगम चघळताना दिसला

सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत (National Anthem) वाजवण्यात आल्याने यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. यादरम्यान विराट कोहली च्युईंगगम चघळताना दिसला

नवी दिल्ली 24 जानेवारी : भारताचा वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिका 3-0 ने जिंकली आहे. अशात आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Viral Video) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सामन्यादरम्यान केलेल्या एक कृत्यामुळे विराट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

INDVsSA : दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा भारताला हरवलं, 3-0 ने मालिका जिंकली

झालं असं की, सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत (National Anthem) वाजवण्यात आल्याने यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. हे दृश्य ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्यात कैद झालं. मात्र, यादरम्यान विराट कोहली च्युईंगगम चघळताना दिसला.

याच कारणामुळे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एका चुकीमुळे चाहते आणि टीकाकार नाराज झाले. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत वाजत होतं. यावेळी कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या अँगलमधून घेतलेल्या शॉटमध्ये विराट दोनदा दिसला आणि दोन्हीवेळा तो एकच काम करताना दिसला. तो यावेळी च्युईंगगम चघळत होता. लोकांना विराटचं हे कृत्य अजिबातही आवडलं नाही आणि तो ट्रोल होऊ लागला.

काय गरज होती का या शॉटची? विराट कोहलीनं ऋषभ पंतला नजरेनं असं झापलं

विराटच्या या कृत्याचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर आता चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

विराटने राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं सांगत अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. या कारणावरुन ट्रोल होण्याची विराटची ही पहिली वेळ नाही. याआधीही 2017 साली श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरू असताना विराट च्युईंगगम खाताना दिसला होता.

First published:

Tags: Video Viral On Social Media, Virat kohli