साउथ आफ्रिका, 23 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा वनडे (South Africa vs India 3rd ODI ) सामना रोमाचंक असाच ठरला आहे. पण विराट कोहली (virat kohali) आणि दीपक चहरची (deepak chahar) धडाकेबाज खेळी वाया गेली आहे. दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा एकदा भारताला पराभूत केले आहे. हातातोंडाशी आलेला सामना भारताला गमवावा लागला आहे. संपूर्ण टीम 283 रन्सवर ऑलआऊट झाली असून भारताने मालिका 3-0 ने गमावली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा वनडे सामना केपटाउन येथील न्यूलैंड्स (Ind vs SA Live Score) इथं खेळवण्यात आला. आफ्रिकेनं दिलेल्या288 धावांचे आव्हान टीम इंडियाने कडक झुंज दिली खरी पण अवघ्या 4 धावांनी भारताचा पराभव झाला आहे. शिखर धवन आणि विराट कोहलीने टीम इंडियाचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला होता. पण, मधली फळी बाद झाल्यानंतर टीम इंडियाला पराभव पत्कारावा लागला. विराट कोहलीने धडाकेबाज ६५ रन्सची खेळी केली. तर शिखर धवनने ६१ रन्स केले. कॅप्टन केएल राहुल अवघ्या ९ रन्स करून माघारी परतला. तर ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव ३९ रन्स आणि श्रेयस अय्यरने २६ रन्स करून टीमची बाजू सांभाळली. पण, श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर दोन ओव्हरनंतर सुर्यकुमार यादवही आऊट झाला. त्यानंतर टीमची कमान दीपक चहरने सांभाळली. 34 बॉलमध्ये चहरने 54 रन्स केले. पण, लुंगी एनगिडीने चहरला आऊट केले. त्यानंतर आलेल्या फलंदाज एकएक करून आऊट झाले. त्यामुळे संपूर्ण टीम 283 रन्स ऑलआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी आणि एंडिल फेहलुकवायोने प्रत्येकी 3 विकेट घेऊन टीम इंडियाला सुरुंग लावला. तर ड्वेन प्रिटोरियस २ विकेट घेतल्या. सिसांडा मगाला आणि केशव महाराजने प्रत्येकी १ विकेट घेतल्या. तर आफ्रिकेच्या टीमने पहिली बॅटिंग करत 288 रन्सचे आव्हान दिले होते. आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 124 रन्स, रासी वैन डर डुसेनने 52 आणि डेविड मिलरने 39 रन्स केले होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







