जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / काय गरज होती का या शॉटची? विराट कोहलीनं ऋषभ पंतला नजरेनं असं झापलं

काय गरज होती का या शॉटची? विराट कोहलीनं ऋषभ पंतला नजरेनं असं झापलं

काय गरज होती का या शॉटची? विराट कोहलीनं ऋषभ पंतला नजरेनं असं झापलं

विराट कोहली यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे रागाने बघताना दिसला. विराट पंतला तो काहीही बोलला नसला तरी त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. कारणही तसंच होतं, पहिलाच चेंडू चुकीच्या पद्धतीनं खेळून पंत मघालाकडे झेल देऊन बाद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

केपटाऊन, 23 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय (IND vs SA 3rd ODI) सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. सामन्यादरम्यान विराट कोहली यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे रागाने बघताना दिसला. विराट पंतला तो काहीही बोलला नसला तरी त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. कारणही तसंच होतं, पहिलाच चेंडू चुकीच्या पद्धतीनं खेळून पंत मघालाकडे झेल देऊन बाद झाला. मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या (IND vs SA 3rd ODI) दक्षिण आफ्रिकेनं 287 धावा करत भारताला विजयासाठी 288 धावांचं लक्ष्य दिलंय. भारतीय डावाच्या 23 व्या षटकात ऋषभ पंत अतिशय खराब फटका मारून बाद झाला. फेहलुकवायोच्या या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर अगोदर शिखर धवन (61 धावा) बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात आला. विराटने ओव्हरचे पुढचे तीन चेंडू खेळले. यानंतर पंत सहाव्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. पंतने अजून खातेही उघडले नव्हते आणि पहिल्याच चेंडूवर त्याने फटकेबाजीचा प्रयत्न केला. परिणामी ज्याची भीती वाटत होती तेच झालं आणि सीमारेषेवर तैनात मगालाने त्याला झेलबाद केले. हे वाचा -  IND vs SA: केएल राहुलचा रॉकेट थ्रो, आफ्रिकेच्या कप्तान तेंबा बावुमाला दाखवला तंबूचा रस्ता – Video अडचणीच्यावेळी पंतचा खराब शॉट, विराट संतापला चुकीच्या फटक्यावर बाद झाल्याने विराट कोहलीने त्याच्याकडे अत्यंत रागीट नजरेने पाहिले. तो पंतला काहीही बोलला नसला तरी त्याचे हावभाव पाहून पंतच्या या बेफिकीर आणि बेजबाबदार फटकेबाजीचा त्याला खूप राग आला होता, याचा अंदाज येतो.

जाहिरात

केपटाऊनमध्येच खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात पंतने असाच शॉट खेळला होता, त्यावेळीही अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीका केली होती. आता पंतने पुन्हा तीच चूक करत टीकाकारांना पुन्हा बोट दाखवण्याची संधी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात