Home /News /sport /

IND VS ENG: लीड्स टेस्टमध्ये मोहम्मद सिराज ब्रिटिश प्रेक्षकांशी भिडला; घटनेचा LIVE VIDEO व्हायरल

IND VS ENG: लीड्स टेस्टमध्ये मोहम्मद सिराज ब्रिटिश प्रेक्षकांशी भिडला; घटनेचा LIVE VIDEO व्हायरल

भारतीय टीमचा गडबडलेला डाव पाहून प्रेक्षक मुद्दाम सिराजला (Mohammed Siraj) स्कोअर विचारत होते. त्या कमेंट्स ऐकून मोहम्मद सिराज यांनंही इंग्लंडच्या प्रेक्षकांकडे तोंड केलं आणि बोट दाखवून उत्तर दिले

नवी दिल्ली 26 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यातील पाच टेस्ट मॅचच्या सिरीजमधील (Test Match Series) तिसरी टेस्ट क्रिकेट मॅच (Third Test) लीड्स स्टेडियमवर (Leads Stadium) सुरू झाली आहे. या सिरीजमधील दुसरी टेस्ट जिंकून भारतानं 1-0 (One-Zero) अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही टेस्ट मॅच चुरशीची होणार आहे. टॉस (Toss) जिंकून भारताचा कॅप्टन विराट कोहली (Captain Virat Kohali) यानं बॅटिंगचा (Batting) निर्णय घेतला. त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. भेदक बॉलिंग करत इंग्लंडनं भारतीय टीमला पहिल्या डावात फक्त 78 अशा लाजिरवाण्या स्कोअरवर तंबूत पाठवलं. पहिला दिवस पूर्णतः इंग्लंडचा होता. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडच्या बॅटसमननी विकेट न गमावता 120 रन्स करून, दिवसाखेर 42 रन्सची आघाडी घेतली. IND vs ENG : ...तर करियर ट्रॅकवर येईल, गावसकरांचा 'गुरू'मंत्र विराट ऐकणार? इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स यांनी शानदार शतकी भागीदारी केली. हसीब हमीद 60 रन्सवर आणि रोरी बर्न्स 52वर नॉट आऊट राहिले, तर फिल्डिंग करतानाही बॉलर जेम्स अँडरसनने 6 रन्स देत 3 विकेट्स आणि ओव्हरटननेही 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा बॉलर अँडरसनने के.एल. राहुलला शून्यावरच परत पाठवले. त्यानंतर पुजारा-विराटही काही वेळातच बाद झाले. रहाणे-पंतही क्रीजवर टिकू शकले नाहीत. भारताने शेवटच्या 5 विकेट्स फक्त 11 रन्समध्ये गमावल्या आणि भारताची पूर्ण टीम फक्त 78 रन्समध्ये आऊट झाली. कोणत्याही भारतीय बॅट्समननी 20 रन्सचा आकडा गाठला नाही आणि रोहित शर्माने सर्वाधिक 19 रन्स केले. भारतीय डावात फक्त 6 फोर मारले गेले. ही भारताची इंग्लंडमधील तिसरी सर्वांत कमी धावसंख्या आहे. इंग्लंडच्या टीमने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असतानाच भारतीय टीममधील फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यानं मात्र इंग्लंडच्या प्रेक्षकांची (England Fans) बोलतीच बंद केली. त्याचा हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. पहिल्या दिवशी इंग्लंड बॅटिंग करत असताना भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज बाउंड्री लाईनवर फिल्डिंग (Fielding) करत होता. त्यावेळी इंग्लंडचे चाहते टीम इंडियाची वाईट अवस्था झाल्यावरून टीका टिपण्णी करत भारतीय टीमची चेष्टा करत होते. IND vs ENG : विराट कोहलीची घोडचूक टीम इंडियाला पडली महागात, सीरिजही धोक्यात! भारतीय टीमचा गडबडलेला डाव पाहून ते मुद्दाम सिराजला स्कोअर विचारत होते. त्या कमेंट्स ऐकून मोहम्मद सिराज यांनंही इंग्लंडच्या प्रेक्षकांकडे तोंड केलं आणि बोट दाखवून उत्तर दिले. मोहम्मद सिराजने आधी बोटानं एकची (One) आणि नंतर शून्यची (Zero) खूण केली. सिराजने स्कोअर सांगितला पण तो मालिकेचा. या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय संघ अजूनही 1-0 असा पुढे आहे, असं त्यानं यातून सांगितलं. त्याला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश क्रिकेट प्रेक्षकांची सिराजच्या जबरदस्त उत्तराने बोलतीच बंद झाली. मोहम्मद सिराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लीड्सच्या खेळपट्टीवर (Leads Crese) मोहम्मद सिराज आपली जादू दाखवू शकला नाही. ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी सुमारे चारच्या इकॉनॉमी रेटने रन्स दिले तर शमीने 11 ओव्हर्समध्ये 39 रन्स दिले. बुमराहने 12 ओव्हर्समध्ये 19 रन्स दिले पण कोणालाही एकही विकेट मिळवता आली नाही. आता भारताला या कसोटीत टिकून राहण्यासाठी चांगला खेळ करण्याची गरज आहे, अन्यथा पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: IND Vs ENG, Mohammad siraf, Sports

पुढील बातम्या