मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : ...तर करियर ट्रॅकवर येईल, गावसकरांचा 'गुरू'मंत्र विराट ऐकणार?

IND vs ENG : ...तर करियर ट्रॅकवर येईल, गावसकरांचा 'गुरू'मंत्र विराट ऐकणार?

गावसकरांचा विराटला मोलाचा सल्ला

गावसकरांचा विराटला मोलाचा सल्ला

4 इनिंग, 69 रन आणि 17.25 ची सरासरी. जगातल्या सर्वोत्तम खेळाडूपैकी एक असलेल्या विराट कोहलीची (Virat Kohli) ही यंदाच्या इंग्लंड दौऱ्यातली (India tour of England) कामगिरी आहे.

लीड्स, 25 ऑगस्ट : 4 इनिंग, 69 रन आणि 17.25 ची सरासरी. जगातल्या सर्वोत्तम खेळाडूपैकी एक असलेल्या विराट कोहलीची (Virat Kohli) ही यंदाच्या इंग्लंड दौऱ्यातली (India tour of England) कामगिरी आहे. टीम इंडियाचा कर्णधार लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही 7 रन करून आऊट झाला. इंग्लंडमध्ये बहुतेक खेळाडूंना रन करताना अडचणी येतात, पण ज्या पद्धतीने विराट आऊट होत आहे, हे चिंतेच आहे, असं भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले आहेत. तसंच त्यांनी विराटची विकेट बघितल्यानंतर त्यांनी लगेच सचिनला (Sachin Tendulkar) फोन करून मदत मागण्याचाही सल्ला दिला आहे.

'विराट कोहलीने लगेच सचिनला फोन केला पाहिजे. मी नेमकं काय करू?, हे विराटने सचिनला विचारलं पाहिजे. सचिनने सिडनीमध्ये जे केलं तेच विराटने करावं. मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही, हे विराटने स्वत:शी ठरवून टाकावं,' असं गावसकर म्हणाले. विराट कोहली सीरिजमध्ये दुसऱ्यांदा जेम्स अंडरसनच्या (James Anderson) बॉलिंगवर आऊट झाला. विराटने अंडरसनच्या बॉलिंगवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटच्या एजला बॉल लागला आणि विकेट कीपर जॉस बटलरने कॅच पकडला.

अंडरसनने टेस्टमध्ये 7व्यांदा विराट कोहलीला आऊट केलं आहे. याचसह विराटला टेस्टमध्ये सर्वाधिकवेळा आऊट करण्याच्या नॅथन लायनच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी केली आहे. विराट कोहली ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या बॉलला छेडत आहे, ही माझ्यासाठी चिंतेची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.

'माझ्यासाठी ही चिंतेची गोष्ट आहे, कारण तो पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्टम्पवरच्या बॉलवर आऊट होत आहे. 2014 सालीही तो ऑफ स्टम्पवर आऊट होत होता,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं. याचसोबत त्यांनी विराटला सचिनच्या सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या खेळीचीही आठवण करून दिली. 2003-04 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सचिनने 241 रनची मॅरेथॉन इनिंग केली होती. 436 बॉलच्या त्या इनिंगमध्ये सचिनने एकही कव्हर ड्राईव्ह मारला नव्हता. कव्हर ड्राईव्ह विराटचा आवडता शॉट आहे, पण हाच शॉट त्याचं आऊट होण्याचं कारणही ठरत आहे. मागच्या 50 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये विराटला एकही शतक करता आलेलं नाही. मागच्या 10 टेस्टमध्ये विराटची सरासरी 24.56 एवढी आहे.

First published:

Tags: India vs england, Sachin tendulkar, Sunil gavaskar, Virat kohli