मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : विराट कोहलीची घोडचूक टीम इंडियाला पडली महागात, सीरिजही धोक्यात!

IND vs ENG : विराट कोहलीची घोडचूक टीम इंडियाला पडली महागात, सीरिजही धोक्यात!

विराटची एक चूक टीम इंडियासाठी अडचणीची

विराटची एक चूक टीम इंडियासाठी अडचणीची

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया (India vs England Third Test) बॅकफूटवर गेली आहे. टीम टॉस जिंकल्यानंतर पहिले बॅटिंग करून 78 रनवर ऑल आऊट झाली. विराटचा (Virat Kohli) हाच निर्णय टीम इंडियासाठी अडचणीचा ठरला.

पुढे वाचा ...

हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया (India vs England Third Test) बॅकफूटवर गेली आहे. टीम टॉस जिंकल्यानंतर पहिले बॅटिंग करून 78 रनवर ऑल आऊट झाली. रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 19 आणि अजिंक्य रहाणने (Ajinkya Rahane) 18 रन केले, याशिवाय भारताच्या कोणत्याही बॅट्समनला दोन अंकी स्कोअर करता आला नाही. इंग्लंडकडून जेम्स अंडरसन (James Anderson) आणि क्रेग ओव्हरटन (Craig Overton) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. पाच टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. याआधी 2014 सालीही भारतीय टीमने सीरिजमध्ये आघाडी घेतल्यानंतर पराभव झेलला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण विराटचा हा निर्णयच टीम इंडियाच्या अंगाशी आला. लीड्समधलं ढगाळ वातावरण आणि मागच्या 3 टेस्टचं रेकॉर्ड बघून विराट पहिले बॉलिंग करेल, असं वाटत होतं. पण विराटच्या या निर्णयामुळे टीम अडचणीत सापडली आहे. पहिल्या इनिंगमध्ये फक्त 40.4 ओव्हरमध्ये 78 रन करून टीमचा ऑल आऊट झाला.

विराट कोहलीने या मैदानावरचं मागच्या 4 वर्षांतलं रेकॉर्ड बघितलं का नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या कालावधीमध्ये तीन टेस्ट झाल्या आणि पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने सगळ्या मॅच गमावल्या. यामध्ये इंग्लंडने दोन मॅच जिंकल्या, तर एका मॅचमध्ये वेस्ट इंडिजने त्यांचा पराभव केला. या तीन मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 258, 174 आणि 179 रन झाल्या, म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये फक्त एकदाच टीमला 200 रनचा आकडा गाठता आला. यावेळी टीम इंडियाला 100 रनही करता आल्या नाहीत.

लीड्सच्या या मैदानात ही 79वी टेस्ट आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने 29 मॅच तर दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमने 31 मॅच जिंकल्या आणि 18 मॅच ड्रॉ झाल्या. हे रेकॉर्ड बघता विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा दिसत आहे.

2002 साली सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न विराटने केला, पण त्यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 8 विकेट गमावून 628 रन केले. गांगुली, द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या तिघांनी शतक केलं होतं. इंग्लंडची टीम 273 आणि 309 रनवर ऑल आऊट झाली होती. टीम इंडियाने हा मुकाबला इनिंग आणि 46 रनने जिंकला होता.

First published:

Tags: India vs england, Virat kohli