मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कुणी काम देतं का काम..,कोट्यवधीचा मालक विनोद कांबळी आला रस्त्यावर, दिवसाची कमाई फक्त 1000 रुपये!

कुणी काम देतं का काम..,कोट्यवधीचा मालक विनोद कांबळी आला रस्त्यावर, दिवसाची कमाई फक्त 1000 रुपये!

'आता मी फक्त बीसीसीआयच्या पेंशनवर जगत आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे सुद्धा गेलो होतो. मी अपेक्षा करतो की, मला काही तरी काम मिळेल.'

'आता मी फक्त बीसीसीआयच्या पेंशनवर जगत आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे सुद्धा गेलो होतो. मी अपेक्षा करतो की, मला काही तरी काम मिळेल.'

'आता मी फक्त बीसीसीआयच्या पेंशनवर जगत आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे सुद्धा गेलो होतो. मी अपेक्षा करतो की, मला काही तरी काम मिळेल.'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 18 ऑगस्ट : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत (sachin tendulkar) कारकिर्द गाजवणाऱ्या विनोद कांबळीवर (Vinod Kambli) मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कुणी काम देत नसल्यामुळे विनोद सध्या बेरोजगार झाला आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेंशनवर त्याला दिवस काढावे लागत आहे. कधी कोट्यवधी रुपये कमावणार विनोद कांबळी आज आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. 18 जानेवरी 1972 जन्मलेला विनोद कांबळीआणि सचिन तेंडुलकर या दोघांनी रमांकात आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले. आचरेकर यांनी सचिनपेक्षा विनोद कांबळी हा चांगला खेळत असल्याचे मान्य केलं होतं. पण, विनोद कांबळीच्या नशिबाने साथ दिली. सचिनने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकार्ड रचत नाव कमावले. पण विनोद कांबळीला हवे तसे यश मिळवता आले नाही. Mid Day च्या वृत्तानुसार, कांबळी सध्या बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 30 हजार रुपये मासिक पेंशन (BCCI Pension) वर आपला उदरनिर्वाह भागवत आहे. दिवस भराचे त्याचे उत्पन्न आता 1000 रुपये इतकेच झाले आहे. 1.5 मिलियन डॉलर्सचा मालक आता कंगाल विनोद कांबळीने पैसा कमावला अशी बाब नाही. त्याने क्रिकेट खेळाडू, जाहिराती आणि क्रिकेट समालोचक म्हणून भरपूर पैसे कमावले. त्याचं नेट वर्थ (Vinod Kambli Net Worth) इन्कम हे 1 ते 1.5 मिलियन डॉलर इतकं होतं. पण, जसा काळ बदलत गेला तसा विनोद कांबळीचा खिस्सा खाली झाला. 2022 च्या रिपोर्टनुसार, विनोद कांबळीचे वार्षिक उत्पन्न आता फक्त 4 लाख रुपये इतके राहिले आहे. सध्या कांबळीकडे स्वत: चा घर आहे. त्याच्याकडे एक रेंज रोव्हर कार आहे. पण, मुंबईसारख्या शहरात जगण्यासाठी हे पुरेसे नाही. लॉकडाऊनचा बसला फटका क्रिकेटपासून दूर झालेल्या विनोद कांबळीकडे पैसे कमावण्यासाठी अनेक पर्याय होते. क्रिकेटच्या वेगवेगळ्या सामन्यात तो कॉमेंट्री करत होता. सोबतच जाहिराती सुद्धा करत होता. त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत होते. एवढंच नाहीतर त्याने काही सिनेमांमध्ये काम सुद्धा केलं होतं. पण, वेळेनुसार, त्याच्या एक एक काम बंद होत गेले. 2019 मध्ये आयपीएलच्य टीमला प्रशिक्षण दिले होते. हे त्याचे शेवटचे काम होते. तीन वर्षांपासून कोरोनाची साथ आली. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले होते. त्यामुळे विनोद कांबळीला मोठा फटका बसला. त्याच्याकडे असलेली काम थांबली. सचिनने केली नेहमी मदत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही चांगले मित्र. दोघांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला. मैदानावरची त्यांची दोस्ती खासगी आयुष्यातही तशीच होती. विनोद कांबळी ज्या ज्यावेळी अडचणीत सापडला होता, त्या त्या वेळी सचिनने त्याला मदत केली. खुद्द कांबळीने अनेक मुलाखतीमध्ये तसं सांगितलं आहे. पण, सचिनने इतकी मदत केली आहे की, आता त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा विनोद ठेवत नाही. (Vinod Kambli: नोकरी देता का नोकरी? टीम इंडियाच्या माजी कसोटीवीराची नोकरीसाठी साद) विनोद कांबळीने आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की, मी आता रोज सकाळी 4 वाजता उठतो, त्यानंतर डीवाय पाटील स्टेडिअमला कॅबने जातो. त्यानंतर बिकेसी मैदानावर शिकवत होतो, पण ते काम फार कठीण होते. आता मी फक्त बीसीसीआयच्या पेंशनवर जगत आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे सुद्धा गेलो होतो. मी अपेक्षा करतो की, मला काही तरी काम मिळेल. कारकिर्द राहिली वादात विनोद कांबळी क्रिकेट करिअरपेक्षा वादात जास्त चर्चेत राहिला. दारूच्या नशेत गाडी चालवत असताना त्याला अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये विनोदने दारूच्या नशेत गाडी चालवत एका गाडीला धडक दिली होती. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. (Ian Chappell: तब्बल 45 वर्षानंतर इयान चॅपेल यांनी सोडलं समालोचन, पाहा काय आहे कारण?) टीम इंडियामध्ये असताना विनोदने 104 वनडे, 17 टेस्ट सामने खेळला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने 3,561 रन्स बनवले. तर 4 शतक टेस्ट मध्ये आणि 2 शतक वनडेमध्ये केले आहे. 1991 मध्ये तो भारतीय टीममध्ये सामील झाला होता. तर 2000 मध्ये त्याने शेवटचा वनडे सामना खेळला.
First published:

पुढील बातम्या