मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बुमराहपेक्षा 'हा' वेगवान गोलंदाज टीम इंडियासाठी लवकरच खेळेल, Ravi Shastri चा दावा

बुमराहपेक्षा 'हा' वेगवान गोलंदाज टीम इंडियासाठी लवकरच खेळेल, Ravi Shastri चा दावा

Umran Malik

Umran Malik

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik ) सध्या खूप चर्चेत आहे. उमरानने मंगळवारी आपल्या वेगाने राजस्थान रॉयल्सच्या (RR) फलंदाजांना अडचणीत आणले.

मुंबई, 30 मार्च: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik ) सध्या खूप चर्चेत आहे. उमरानने मंगळवारी आपल्या वेगाने राजस्थान रॉयल्सच्या (RR) फलंदाजांना अडचणीत आणले. उमरानने त्याच्या स्पेल दरम्यान 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्याची ही वादळी गोलंदाची पाहून टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri ) चकित झाले आहेत. त्यांनी बुमराह पेक्षा घातक गोलंदाज असल्याचे सांगत उमरानचे कौतुक केले आहे. यासोबत त्यांनी तो टीम इंडियाकडून लवकरच मैदानात उतरेल असा दावादेखील त्यांनी यावेळी केला.

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले की, ‘उमरान मलिक खूप प्रतिभावान आहे आणि तो खूप चांगला गोलंदाज आहे. उमरान मलिक हा भारतीय संघात असायला हवा. तो उच्च स्तरावर खेळण्यास तयार होईल तेव्हा तो सुपरस्टार म्हणून उदयास येईल. अशा शब्दात कौतुक केले.

IPL 2022 मधील पहिला वाद! विल्यमसनच्या विकेटवर SRH चे कोच नाराज, म्हणाले...

तसेच, लवकरच जसप्रीत बुमराहपेक्षा वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेट संघासाठी खेळेल. असा दावाही त्यांनी यावेळी केला. यासोबतच, उमरान मलिक हा भारतीय खेळाडू आहे, त्याला काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला.

मात्र, हैदराबादच्या पराभवानंतरही टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री मंगळवारी वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा वेग आणि वृत्ती पाहून खूप प्रभावित झाले.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, सनरायझर्स हैदराबादने उमरान मलिकला कायम ठेवत सर्वांना आश्चर्यचकित केले. आयपीएल 2021 मध्ये मलिकने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. कर्णधार केन विल्यमसन आणि अष्टपैलू अब्दुल समदसह उमरान मलिकला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

उमरानने चार षटकात 39 धावा देत जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल या दोघांची विकेट घेतली. उमरान मलिकची (Umran Malik) सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याने पहिल्याच षटकात 21 धावा दिल्या, ज्यामध्ये जॉस बटलरच्या 20 धावा होत्या.

First published:

Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, Ravi shashtri, SRH