मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 मधील पहिला वाद! विल्यमसनच्या विकेटवर SRH चे कोच नाराज, म्हणाले...

IPL 2022 मधील पहिला वाद! विल्यमसनच्या विकेटवर SRH चे कोच नाराज, म्हणाले...

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सकडून (SRH vs RR) मोठा पराभव झाला. या मॅचमधील  केन विल्यमसनच्या (Kane Williamson) विकेटवरून वाद सुरू झाला आहे.

मुंबई, 30 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सकडून (SRH vs RR) मोठा पराभव झाला. या मॅचमधील  केन विल्यमसनच्या (Kane Williamson) विकेटवरून वाद सुरू झाला आहे. क्रिकेट फॅन्सनी या निर्णयावर सोशल मीडियातून टीका केलीय. त्याचबरोबर हैदराबादचे कोच टॉम मुडी (Tom Moody) यांनीही टीव्ही अंपायरच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली आहे.

हैदराबादच्या इनिंगमधील दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलनं विल्यमसनचा कॅच घेतला. त्यावेळी फिल्ड अंपायरनं टीव्ही अंपायरकंडं या निर्णयाची विचारणा केली होती. त्यावर टीव्ही अंपायरनं रिप्ले पाहून विल्यमसन आऊट असल्याचा निर्णय दिला. मात्र पडिक्कलच्या हातामध्ये जाण्यापूर्वी बॉल जमिनीवर पडल्याचं स्पष्ट दिसत होतं.

या मॅचनंतर हैदराबादचे कोच टॉम मूडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की 'केनला आऊट दिलेलं पाहून आम्हाला मोठा धक्का बसला. फिल्ड अंपायरनं थर्ड अंपायरकडं निर्णय का सोपवला हे मी समजू शकतो. आम्ही पुरावे पाहिले. त्यावरून स्पष्ट दिसतं होतं की बॉल जमिनीला लागला आहे. निर्णय काय हवा होता हे सर्वांनाच माहिती आहे.' या शब्दात मुडी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

कॅचनंतर बदलली मॅच

विल्यमसन कॅच आऊट झाल्यानंतर हैदराबादची इनिंग चांगलीच ढेपाळली. 211 रनचा पाठलाग करताना 10 ओव्हर्सनंतर हैदराबादचे 5 आऊट 37 रन होते. केन विल्यमसन 2 रनवर, अभिषेक शर्मा 9 रनवर आऊट झाले, तर राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरन शून्य रनवर माघारी परतले. अब्दुल समदलाही फक्त 4 रन करता आले.

IPL 2022, RCB vs KKR : पहिल्या विजयासाठी 'या' Playing11 सह उतरणार बँगलोर

हैदराबादकडून एडन मार्करमने (Aiden Markram) 41 बॉलमध्ये नाबाद 57 रन केले, तर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 14 बॉलमध्ये 40 रनची तडाखेबाज खेळी केली. त्यांचे हे प्रयत्न विजयासाठी अपुरे पडले. हैदराबादनं ही लढत 61 रननं गमावली.

First published:
top videos

    Tags: Cricket, Ipl 2022, SRH