टीम इंडियाची निवड कोण करणार? बीसीसीआयने ठेवल्यात 'या' अटी

टीम इंडियाची निवड कोण करणार? बीसीसीआयने ठेवल्यात 'या' अटी

सध्याचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपणार असून त्यांच्याजागी नविन नियुक्ती करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बीसीसीआय़ने काही अटी ठेवल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच निवडकर्त्याच्या अर्जाचा विचार केला जाईल. सध्याचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या जागी नविन नियुक्तीसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयकडून दिलेल्या जाहिरातीत म्हटलं आहे की, भारतीय पुरुष संघाच्या राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या दोन पदे भरायची असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

निवडकर्त्यांची निवड करण्यासाठी बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समिती नियुक्त करणार आहे. त्यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू मदन लाल आणि गौतम गंभीर असण्याची शक्यता आहे. तसेच महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू सुलक्षणा नाइक यांच्या नावाचाही समावेश असू शकतो. ही समिती एक बैठक घेऊन निवड समितीच्या दोन सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सध्याच्या निवड समितीमधील सदस्यांपैकी अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर सरनदीप सिंग, देवांग गांधी आणि जतिन परांजपे यांचा कार्यकाळ एक वर्ष शिल्लक आहे.

निवडकर्त्याच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला काही अटी बीसीसीआयने घातल्या आहेत. उमेदवाराने किमान 7 कसोटी सामने किंवा 20 प्रथम श्रेणीचे सामने, 10 एकदिवसीय आणि प20 प्रथम श्रेणीचे सामने खेळण्याचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराने निवृत्ती घेऊन किमान 5 वर्ष होणं बंधनकारक आहे. ही निवड चार वर्षांसाठी असणार आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीत भारताची डोकेदुखी वाढणार?

First published: January 19, 2020, 12:00 PM IST
Tags: BCCI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading