जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / फुटबॉल विश्वावर शोककळा! तुर्कस्तानमधील भूकंपात फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू

फुटबॉल विश्वावर शोककळा! तुर्कस्तानमधील भूकंपात फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू

तुर्कस्तानमधील भूकंपात फुटबॉलपटू अहमत इयुप तुर्कस्लानचा  दुर्दैवी मृत्यू

तुर्कस्तानमधील भूकंपात फुटबॉलपटू अहमत इयुप तुर्कस्लानचा दुर्दैवी मृत्यू

6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात अहमत इयुप ढिगाऱ्याखाली अडकला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बचाव पथकाला त्याचे शव मिळाले. त्याने आतापर्यंत वरिष्ठ स्थरावर 87 फुटबॉल सामने खेळले होते. त्याच्या मृत्यूने जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी : तुर्कस्तान आणि सिरिया हे दोन देश सध्या भूकंपाने हादरले आहेत. सोमवारी झालेल्या या भूकंपामुळे दोन्ही देशात हाहाकार उडाला असून यात तब्बल 8 हजारहून अधिक नागरिक यात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकड्यात आणखी वाढ होण्याती भीती व्यक्त होत असून यात एका फुटबॉलपटूचा मृत्यू झाल्याने फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे.   हे ही वाचा : कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक तुर्कीमध्ये गेल्या काही दिवसात 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन भूकंप झाले. या भूकंपात तुर्कस्तानचा 28 वर्षीय फुटबॉलपटू अहमत इयुप तुर्कस्लान याचा देखील यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात अहमत इयुप ढिगाऱ्याखाली अडकला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बचाव पथकाला त्याचे शव मिळाले. हे ही वाचा  : रिषभ पंतवर भडकले कपिल देव! म्हणाले, ‘मी त्याच्या कानाखाली वाजवेन’ मागील दहा वर्षांपासून अहमत इयुप तुर्कस्लान हा वरिष्ठ स्तरावरील फुटबॉल मध्ये खेळत होता. त्याने आतापर्यंत पाच संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्याने 87 सामने खेळले होते. काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह देखील झाला होता. याच्या मृत्यूने जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात