advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक

कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक

सध्या अनेक क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासह आध्यात्मिक यात्रा करीत असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हा असंख्य चाहत्यांचा गोतावळा सांभाळणारे क्रिकेटपटू नक्की कोणत्या देवाची भक्ती करतात याविषयी जाणून घेऊयात.

01
सध्या भारतीय क्रिकेटपटू खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिकतेकडे वळताना दिसत आहेत. अनेक क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासह आध्यात्मिक यात्रा करीत असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हा असंख्य चाहत्यांचा गोतावळा सांभाळणारे क्रिकेटपटू नक्की कोणत्या देवाची भक्ती करतात याविषयी अनेकांना जाऊन घेण्यात रस असतो.

02
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा अनेक खेळाडूंचे दैवत आहे. सचिन श्री सत्य साई बाबा यांचा भक्त आहे. श्री सत्य साई बाबा हे हयात असताना अनेकदा सचिन त्यांच्या सत्संग कार्यक्रमांना उपस्थिती लावायचा. सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंबीय अनेकदा शिर्डी येथील साईबाबा मंदिरात देखील दर्शनासाठी जात असतात.

03
विराट कोहली काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीसोबत आध्यात्मिक यात्रा करीत होता. त्याने ऋषिकेश येथील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट देऊन तेथील धार्मिक कार्यात सहभाग घेतला. त्यानंतर विराट अनुष्का या दोघांनी आश्रमात भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन देखील केले होते.

04
ऋषिकेश यात्रेपूर्वी विराट कोहलीने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका सोबत वृंदावन येथे देखील भेट दिली होती.

05
 भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देखील काही दिवसांपूर्वी झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

06
 भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा अनेकदा मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असतो. सिद्धिविनायकावर रोहित आणि त्याच्या कुटुंबाची अपार श्रद्धा आहे.

07
सौरभ गांगुली हा माँ दुर्गेचा निस्सीम भक्त आहे. तो अनेकदा दुर्गा पूजा कार्यक्रमात सहभागी होत असतो.

08
भारताचे माजी क्रिकेटर हरभजन सिंह आणि युवराज सिंह हे दोघे शीख समुदायातील असल्याने अनेकदा गुरुद्वाराला भेट देत असतात. युवराज आणि हरभजन सिंह गुरुद्वारेत सेवा करतानाचे फोटो समोर आले होते.

09
दीपक चहर आणि त्याची पत्नी जया हे दोघे सध्या ऋषिकेश येथे आध्यात्मिक यात्रा करीत आहेत. दोघे नदी किनारी पूजा करीत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या भारतीय क्रिकेटपटू खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिकतेकडे वळताना दिसत आहेत. अनेक क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासह आध्यात्मिक यात्रा करीत असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हा असंख्य चाहत्यांचा गोतावळा सांभाळणारे क्रिकेटपटू नक्की कोणत्या देवाची भक्ती करतात याविषयी अनेकांना जाऊन घेण्यात रस असतो.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement