मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्युझीलंड (New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे सामन्यात अनेक मजेशीर प्रसंग घडले. मात्र ट्रेंट बोल्टसोबत घडलेला प्रसंग सर्वात जास्त मजेशीर होता. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करताना बोल्टच्या बॅटलाही न लागला चेंडू मैदानातून गायब झाला. सामना सुरू असताना फलंदाजासह सर्वांची शोधाशोध सुरू झाला. या प्रसंगाचा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात हा प्रकार घडला. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बोल्टला शॉट खेळता आला नाही आणि चेंडू त्याच्या पॅडच्या आत घुसला. मात्र कोणालाच कळले नाही, म्हणून मैदानात शोधाशोध सुरू झाली. अखेर बोल्टला जेव्हा कळले तेव्हा त्यांनं चेंडू काढून दिला. या प्रसंगानंतर मैदानात एकच हशा पिकला.
वाचा-क्रिकेटपटूंनी हॉटेलमध्ये महिलेसोबत केले अश्लिल वर्तन, संघातून हकालपट्टी
Trent Boult made the red cherry disappear! 🎩✨ Steve Smith and Nathan Lyon's reactions are priceless! @bet365_aus | #AUSvNZ pic.twitter.com/NS3GFUpZMc
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2019
वाचा-शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत
चेंडू सापडल्यानंतर सर्व खेळाडूंचा हास्यकल्लोळ
चेंडू सापडल्यानंतर यष्टिरक्षक टिम पेन, स्टिव्ह स्मिथ स्लिपवर उभा, पॉईंटवर उभा असलेले नॅथन लिऑन यांनी बॉल वेगवेगळ्या दिशेने पाहण्यास सुरवात केली. सुरुवातीला चेंडू कोठे गेला हे कॅमेरा देखील पकडू शकला नाही. मात्र चेंडू सापडल्यानंतर सर्वच खेळाडू हसू लागले. त्याच्यासोबत फलंदाजी करणारा नील वॅग्नर हसणे थांबवू शकला नाही, तेव्हा नॅथन लायनही हसला. फलंदाजीदरम्यान बोल्टने 8 धावा केल्या आणि तो मिशेल स्टार्कचा बळी ठरला.
वाचा-अरे देवा! हवेत उडी मारत फक्त 3 बोटांत पकडला कॅच, हा VIDEO पाहून व्हाल हैराण
148 धावांत आटपला न्यूझीलंडचा डाव
पॅट कमिन्सचा जलद गोलंदाजानं शानदार गोलंदाजी न्यूझीलंडच्या संघाला 148 धावांवर आटपले. त्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे आता मोठी आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 467 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं दिवसाच्या सुरुवातीलाच 2 विकेट गमावत 44 धावा केल्या. कमिन्सनं 5 तर जेम्य पॅटिंन्सननं 3 आणि मिशेल स्टार्कने 2विकेट घेतल्या. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला 319 धावांची आघाडी मिळाली आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमनं 144 चेंडूत 50 धावा केल्या. आपले 16वे अर्धशतक पूर्ण करत कमिन्स बाद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.