जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेटपटूंनी हॉटेलमध्ये महिलेसोबत केले अश्लिल वर्तन, संघातून हकालपट्टी

क्रिकेटपटूंनी हॉटेलमध्ये महिलेसोबत केले अश्लिल वर्तन, संघातून हकालपट्टी

क्रिकेटपटूंनी हॉटेलमध्ये महिलेसोबत केले अश्लिल वर्तन, संघातून हकालपट्टी

दिल्ली जिल्हा क्रिकेट संघानं (DDCA) बंगालविरुद्ध झालेल्या नायडू ट्रॉफी सामन्यानंतर या खेळाडूंवरचे आरोप सिध्द झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : दिल्ली अंडर-23 (Delhi U23) क्रिकेट संघाच्या दोन युवा खेळाडूंवर हॉटेलमधल्या महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवा खेळाडू कुलदीप यादव आणि लक्ष्य थरेजा यांच्यावर दिल्ली क्रिकेट बोर्डानं कारवाई केली आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघानं (DDCA) बंगालविरुद्ध झालेल्या नायडू ट्रॉफी सामन्यानंतर या खेळाडूंवरचे आरोप सिध्द झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीच्या खेळाडूंची हकालपट्टी दिल्ली अंडर-23 संघाचा फलंदाज थरेजानं लिस्ट ए संघाकडून खेळताना अर्धशतकी कामगिरी केली होती. तर, जलद गोलंदाज कुलदीपनं पंजाबविरुद्ध रणजी सामन्यात इशांत शर्माची जागा घेणार होता. मात्र आता कारवाई करण्यात आल्यामुळं त्यांना क्रिकेट खेळता येणार नाही आहे. दरम्यान या दोन खेळाडूंविरुद्ध पोलिसात अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही आहे. मात्र डीडीसीएकचे प्रमुख संजय भारद्वाज यांनी दोन्ही खेळाडूंना घरी पाठवले आहे. वाचा- ‘भेदभाव केला जात असता तर हिंदू असलेला दानिश कनेरिया पाकिस्तान संघात खेळला नसता’ ख्रिसमस पार्टीमध्ये केले गैरवर्तणुक डीडीसीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी पीटीआयला माहिती देताना, “संजय भारद्वाज कोलकातामध्ये आहेत. आजपासून बंगालविरुद्धच्या सामन्यात दोन्ही खेळाडू खेळणार नाही आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला घरी परत पाठविण्यात आले आहे. ख्रिसमस पार्टीसाठी हे दोन्ही खेळाडू हॉटेलमध्ये पोहचले होते. यानंतर या दोघांनी महिला कर्मचाऱ्याचा पाठलाग करुन तिच्या खोलीत पोहोचले आणि सतत तिचे दार ठोठावले. यानंतर महिला कर्मचाऱ्याने रिसेप्शनला बोलावले व त्याबद्दल तक्रार केली. सीसीटीव्ही फुटेजमुळे त्यांची ओळख पटली”, असे सांगितले. दरम्यान, पोलिसांत या प्रकरणाची तक्रार करण्यात आलेली नाही. वाचा- पंतका टाईम आयेगा! मुख्य निवड समितीच्या प्रमुखांनी ऋषभवर केले अजब विधान डीडीसीए करणार कारवाई इशांत पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे अपेक्षित होते, परंतु आता डीडीसीए या दोन खेळाडूंविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे. दिल्लीने बंगालविरुद्ध 36 षटकांत 4 बाद 110 धावा केल्या. मनजोत कालरा 59 धावांवर खेळत आहे. जेयू कॅम्पस मैदानावर दिल्ली आणि बंगाल यांच्यात खेळलेल्या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीला आला. संघाने पहिल्या दिवशी चार विकेट गमावत 110 धावा केल्या. वाचा- शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात