जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत

शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत

शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक सध्या एका फोटोमुळं सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक सध्या एका फोटोमुळं सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. शोएब मलिकनं नाताळच्या शुभेच्छा देताना एक फोटो पोस्ट केला, या फोटोमध्ये मलिकसोबत धोनीही दिसत आहे. यामुळं भारतीय चाहत्यांनी मलिकला ट्रोल करण्यात आले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने स्वत: चा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याला जोरदार ट्रोल केले आहे. केले जात आहे. शोएब मलिकने पाकिस्तानकडून 35 कसोटी, 287 एकदिवसीय सामने आणि 111 टी -20 सामने खेळले आहेत. मात्र त्यानं वर्ल्ड कप 2019नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मलिकनं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये धोनी केवळ पाठमोरा दिसत आहे. मलिकनं या फोटोला ‘नाताळच्या शुभेच्छा आणि एक अद्भुत 25 डिसेंबर’, असे कॅप्शन लिहिले आहे. वाचा- धोनीच्या नेतृत्वाखाली CSKकडून खेळणाऱ्या गोलंदाजानं जाहीर केली निवृत्ती

जाहिरात

मुळात 25 डिसेंबर 2012 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी -20 सामन्यात शोएब मलिक आणि महेंद्रसिंग धोनीचे हे चित्र आहे. या सामन्यात पाकिस्तानने पाच विकेट्स राखून विजय मिळविला, त्यात मलिकने शानदार अर्धशतक झळकावले होते. वाचा- पाकिस्तानने 67 वर्षांत फक्त दोनच हिंदूना क्रिकेट संघात दिली जागा!

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

वाचा- अरे देवा! हवेत उडी मारत फक्त 3 बोटांत पकडला कॅच, हा VIDEO पाहून व्हाल हैराण या सामन्यात पाकिस्तानने पाच गडी राखून मिळवला होता विजय 2012मध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने प्रथम खेळताना 133 धावा केल्या होत्या. भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीरने यात सर्वाधिक योगदान दिले. गंभीरने 43 धावांची खेळी केली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणेने 42 धावांचे योगदान दिले. बंगळुरु येथे झालेल्या या सामन्यात वेगवान गोलंदाज उमर गुलने पाकिस्तानकडून सर्वाधिक तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने दोन चेंडू शिल्लक ठेवून लक्ष्य साध्य केले. यात शोएब मलिकने सामना जिंकणारा डाव खेळताना 50 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात