अरे देवा! हवेत उडी मारत फक्त 3 बोटांत पकडला कॅच, हा VIDEO पाहून व्हाल हैराण

अरे देवा! हवेत उडी मारत फक्त 3 बोटांत पकडला कॅच, हा VIDEO पाहून व्हाल हैराण

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील हा जबरदस्त कॅच अजिबात मिस करू नका.

  • Share this:

मेलबर्न, 27 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्ये वैशिष्टय म्हणजे 1987नंतर न्यूझीलंडचा हा पहिला बॉक्सिंग डे सामना आहे. या सामन्यात एका पेक्षा एक असे प्रकार घडत आहेत मात्र सर्वात आश्चर्यकारक प्रकार होता तो म्हणजे स्टिव्ह स्मिथची विकेट. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज स्मिथला बाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या रणनीती वापरल्या. मात्र अखेर न्यूझीलंडचा हेनरी निकोल्सनं तीन बोटांत कॅच पकडत स्मिथला बाद केले.

बॉक्सिंग डे दिवशी खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याचे महत्त्व वेगळे आहे. यात स्मिथ हा बॉक्सिंग डेचा किंग म्हणून ओळखला जातो. न्यूझीलंडविरुद्ध स्मिथनं 85 धावांची खेळी केली. स्मिथच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवशी 467 धावांपर्यंत मजल मारली. मात्र या डावात स्मिथची विकेट न्यूझीलंडसाठी महत्त्वाची होती. त्याचप्रमाणे न्यूझीलंडच्या प्लॅनमध्ये स्मिथ अडकला. हेनरी निकोल्सनं फक्त तीन बोटांत हा कॅच पकडला.

वाचा-एकाच दिवसात दोन फलंदाजांच्या जीवावर बेतला चेंडू, पाहा धक्कादायक बाउन्सरचा VIDEO

स्मिथ 85 धावांवर फलंदाजी करत असताना नेल वेग्नरनं 105व्या ओव्हरमध्ये चेंडू थोडा बाउन्स केला, आणि अपर कट मारण्याच्या नादात स्मिथच्या बॅटच्या टोकाला चेंडू लागला. मात्र या श्रेय जाते ते हेनरी निकोल्सला. त्यानं हवेत उडी मारत तीन बोटांत उत्कृष्ठ झेल टिपला.

वाचा-VIDEO : 130 किमी वेगानं आला चेंडू, फलंदाज जमिनीवर आणि स्टम्प हवेत!

वाचा-IPL : ‘या’ श्रीलंकेच्या खेळाडूवर 27 कोटी खर्च करण्यासाठी विराट होता तयार पण...

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या 467 धावा

या सामन्यात केन विल्यमसननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकातच जो बर्न्सला त्रिफळाचीत केले. त्यानंतर लाबूशेन आणि वॉर्नरने डाव सावरला. मात्र वॉर्नर 41 धावांवर तर लाबूशेन 63 धावांवर बाद झाला. स्मिथ आणि लाबूशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत 83 धावांची भागीदारी केली. अखेर स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाला 400चा आकडा पार करून दिला. स्मिथनं 85 धावांची खेळी केली तर टीम पेननं 79 आणि हेडनं 114 धावांची खेळी करत, ऑस्ट्रेलियाचा डाव 467 धावांत संपुष्टात आला.

Published by: Priyanka Gawde
First published: December 27, 2019, 1:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading