मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : विराटने सांगितला इंग्लंडमध्ये जिंकण्याचा मंत्र, भारतीय खेळाडूंना दिला मेसेज

IND vs ENG : विराटने सांगितला इंग्लंडमध्ये जिंकण्याचा मंत्र, भारतीय खेळाडूंना दिला मेसेज

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज टीम इंडियासाठी (India vs England) खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ही सीरिज टीमसाठी मोठी असल्याचं सांगितलं आहे.

नॉटिंघम, 3 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज टीम इंडियासाठी (India vs England) खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही ही सीरिज टीमसाठी मोठी असल्याचं सांगितलं आहे. इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी खूप प्रयत्न आणि पूर्णपणे श्रेष्ठत्व मिळवण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला बुधवारी सुरुवात होणार आहे.

विराट कोहलीने सीरिज सुरू व्हायच्या आधी स्काय स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणाऱ्या दिनेश कार्तिकसोबत (Dinesh Karthik) चर्चा केली. 'आपल्याला कठोर मेहनत करावी लागणार आहे, हे प्रत्येक खेळाडूने स्वत:ला सांगावं. प्रत्येक टेस्ट मॅचच्या प्रत्येक दिवस कठीण असतो, यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार असणं गरजेचं असतं. माझ्यासाठी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यापेक्षा मोठं काहीही नाही,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

'आम्ही मैदानात उतरताच स्पर्धा करतो. प्रत्येक टेस्ट मॅच जिंकण्याचाच आमचा प्रयत्न असतो, हेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इंग्लंडमध्ये विजय मिळवणं भारतीय क्रिकेटसाठी मोठी गोष्ट असेल. माझ्या क्षमतेनुसार मी सगळं काही करेन. मॅचच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण आत्मसमर्पण करून मॅच वाचवणं मला आवडत नाही,' असं वक्तव्य विराटने केलं.

First published:

Tags: Cricket, India vs england, Virat kohli