मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics 2020: चानूची चॅम्पियन बनण्याची कहाणी! मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची 'सिल्व्हर गर्ल'

Tokyo Olympics 2020: चानूची चॅम्पियन बनण्याची कहाणी! मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची 'सिल्व्हर गर्ल'

भारतासाठी आजचा दिवस नक्कीच खास आहे. मीराबाई चानूने (Who is Mirabai Chanu) भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाईने सिल्ह्वर मेडल जिंकलं आहे. जाणून घ्या मीराबाईबद्दल

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 24 जुलै: भारतासाठी आजचा दिवस नक्कीच खास आहे. मीराबाई चानूने (Who is Mirabai Chanu) भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग स्पर्धेत  भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक मेडल स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे.  या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे. चानूनं स्नॅच गटातील  पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी  उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले.

मीराबाई चानूने आज इतिहास घडवला पण हे ध्येय गाठणं सोपं नव्हतं, यामध्ये बालपणी केलेले कष्ट आहेत, कठोर मेहनत आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, चानू देखील वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या मोठ्या भावापेक्षा जास्त वजनाची लाकडं गोळा करत असे. लहानपणी घेतलेले हे कष्ट आज तिच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या पराभवानंतर डगमगून न जाता आज ती पुन्हा त्याच जोमाने मैदानात उतरली आणि जिंकली!

हे वाचा-Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं घडवला इतिहास, सिल्व्हर मेडल जिंकले!

इंफाळपासून 20 किमी दूर असणाऱ्या नोंगपोक काकचिंग गावात गरीब परिवारात चानूचा जन्म झाला होता. तिच्या कुटुंबात सहा भावंड होती, तिच्यापेक्षा चार वर्षांने मोठ्या असणाऱ्या सैखोम सांतोम्बा मीतेई या तिच्या भावासह ती लाकडं गोळा करण्यासाठी जात असे. झी न्यूजच्या वृत्तानुसार यावेळचा एक अनुभव तिच्या भावाने शेअर केला होता. जो लाकडाचा गठ्ठा तिच्या भावाला उचलता आला नव्हता तो मीराने सहज उचलला. त्यावेळी ती 12 वर्षांची होती. तिचा भाऊ राज्यस्तरीय फुटबॉलर आहे.

वेटलिफ्टर नाही तर व्हायचं होतं तिरंदाज!

मीराबाई चानूचा जन्म मणिपूरमध्ये झाला होता. सुरुवातीला तिनं तिरंदाज होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र काही कारणांमुळे तिला वेटलिफ्टिंगकडे वळावं लागलं. आज देशातील एक टॉपची वेटलिफ्टर म्हणून तिची ओळख आहे. इंफाळच्या वेटलिफ्टर कुंजराणी यांच्यामुळे प्रभावित होत मीराबाईने यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आज तिच्या या निर्णयामुळे भारताला एक यशस्वी आणि धडाकेबाज वेटलिफ्टर मिळाली आहे.

हे वाचा-Tokyo Olympics : चक दे इंडिया! पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडवर थरारक विजय

मीराबाईची यशस्वी कामगिरी

2014 मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराने भारतासाठी रौप्यपदक जिंकलं होतं. ती भारताची स्टार वेटलिफ्टर ठरली आहे. अमेरिकेत 50 दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तिने थेट टोकयो गाठलं होतं. मात्र हे कष्ट केवळ पन्नास दिवसांचे नाहीत, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या पराभवापासूनचे आहेत. त्यावेळी मीराबाई चानूला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये तिने विशेष कामगिरी केली नव्हती. मात्र त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.  2017 मध्ये वर्ल्ड चँपियनशिप आणि साल 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं सुवर्णपदक जिंकलं. आणि आता पुन्हा एकदा तिने भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे.

First published:

Tags: Olympic, Olympics 2021