• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं घडवला इतिहास, सिल्व्हर मेडल जिंकले!

Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं घडवला इतिहास, सिल्व्हर मेडल जिंकले!

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे.

 • Share this:
  टोकयो, 24 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग स्पर्धेत  भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. ( Mirabai Chanu wins silver in Weightlifting Women's 49kg category) या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे.चानूनं स्नॅच गटातील  पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी  उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते. त्यानंतर मीराबाईनं टोकयोमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. चानू यावेळी 49 किलो वजनी गटामध्ये सहभागी झाली होती. पाच वर्षांपूर्वी रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही माीराबाईकडून पदकाची मोठी अपेक्षा होती. त्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनं निराश केलं होतं. त्या स्पर्धेत तिला सहा प्रयत्नात फक्त एकच वेळी वजन उचलण्यात यश मिळाले होते. Tokyo Olympics : प्रवीण जाधवकडून मोठी चूक, भारताचे मेडल हुकले भारताकडून करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकले होते. मल्लेश्वरीनं सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. त्यानंतर 21 वर्षांनी चानूनं भारताची या खेळामधील प्रतीक्षा समाप्त केली आहे. रियो ऑलिम्पिकनंतर जवळपास प्रत्येक स्पर्धेत चानूनं मेडल जिंकले होते. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सचा समावेश आहे. त्याचबरोबर एशियन चॅम्पियनशिपमध्येही चानूनं ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.
  Published by:News18 Desk
  First published: