मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Neeraj Chopra च्या भाल्यासाठी पैशांचा पाऊस, e-Auctionमध्ये पहिल्याच दिवशी ओलांडला 5 कोटींचा टप्पा

Neeraj Chopra च्या भाल्यासाठी पैशांचा पाऊस, e-Auctionमध्ये पहिल्याच दिवशी ओलांडला 5 कोटींचा टप्पा

नीरज चोप्राच्या त्या ऐतिहासिक भाल्याचा (Javelin) ई-लिलाव (E-Auction of Neeraj Chopra Javelin) केला जात आहे. ई-लिलावात या सुवर्णपदक विजेत्या भाल्यासाठी सर्वप्रथम 1 कोटी रूपयांची बेस प्राइज ठेवण्यात आली होती.

नीरज चोप्राच्या त्या ऐतिहासिक भाल्याचा (Javelin) ई-लिलाव (E-Auction of Neeraj Chopra Javelin) केला जात आहे. ई-लिलावात या सुवर्णपदक विजेत्या भाल्यासाठी सर्वप्रथम 1 कोटी रूपयांची बेस प्राइज ठेवण्यात आली होती.

नीरज चोप्राच्या त्या ऐतिहासिक भाल्याचा (Javelin) ई-लिलाव (E-Auction of Neeraj Chopra Javelin) केला जात आहे. ई-लिलावात या सुवर्णपदक विजेत्या भाल्यासाठी सर्वप्रथम 1 कोटी रूपयांची बेस प्राइज ठेवण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: जपानमधील टोकयो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympic 2020 Updates) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra won Gold Medal) सुवर्णपदक पटकावत इतिहास घडवला. सध्या नीरज चोप्राच्या त्या ऐतिहासिक भाल्याचा (Javelin) ई-लिलाव (E-Auction of Neeraj Chopra Javelin) केला जात आहे. ई-लिलावात या सुवर्णपदक विजेत्या भाल्यासाठी सर्वप्रथम 1 कोटी रूपयांची बेस प्राइज ठेवण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी बोलीनं 5 कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. या भारतीय क्रीडापटूनं ज्या भाल्यामुळे ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळालं तो भाला आणि इतर क्रीडा साहित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi and Neeraj Chopra Meet) यांना भेट दिलं होतं.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (17 सप्टेंबर 2021) अशा अनेक मौल्यवान भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू करण्यात आला आहे. यात पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या क्रीडा साहित्यासह शिल्प, स्मृतीचिन्हं, महत्त्वाच्या इमारतींची मॉडेल्स, चित्रं आदींचा समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम `नमामि गंगे` या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.

    हे वाचा-न्यूझीलंडनं दौरा का सोडला? रावळपिंडीच्या मैदानातील धक्कादायक VIDEO VIRAL

    पहिल्याच दिवशी या लिलावामधून 10 कोटींहून अधिक रक्कम मिळाली असून, अजून 19 दिवस बाकी आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक पटकवणारी महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain Gloves Auction) ग्लोव्हजसाठी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 11 बोली लावण्यात आल्या. या ग्लोव्हजची मूळ किंमत 80 लाख रुपये अशी होती मात्र बोलीत सर्वाधिक किंमत 1.92 कोटी रुपयांवर पोहोचली. या लिलावात पॅरालिम्पिकमधील सुर्वणपदक विजेता भालाफेकपटू आणि जागतिक विक्रमवीर सुमित अँटिलच्या भाल्यासाठी 1 कोटी 8 हजार रुपयांची बोली लागली. या भाल्याची मूळ किंमत 1 कोटी रूपये होती. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ चौथ्या क्रमांकावर होता. मात्र संघाची कर्णधार राणी रामपालच्या (Rani Rampal Hockey Stick e-Acution) हॉकी स्टिकसाठी या लिलावात उच्चतम बोली लावण्यात आली होती. तिच्या हॉकी स्टिकची मूळ किंमत 80 लाख रूपये असताना त्या तुलनेत बोली मात्र 1,00,00,100 रूपयांची होती.

    हे वाचा-'विराट कोहलीला T20 नंतर आणखी एका टीमची कॅप्टनसी सोडावी लागणार'

    या लिलावात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांच्या तिरंग्याची पार्श्वभूमी असलेल्या दोन पॅनेल्सवर साकारलेल्या अॅक्रेलिक पेटिंगचाही समावेश करण्यात आला होता. या पेटिंगची मूळ किंमत 25 लाख रूपये आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी विविध प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या अनेक चित्रांचा लिलाव केला जात असून, या कलाकृतींची मूळ किंमत 3 लाख रूपये ते 25 लाख रुपये अशी आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये मान्यवर व्यक्तींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या महत्त्वाच्या इमारती, शिल्पं, चित्रं आणि स्मृतीचिन्हांचाही या लिलावात समावेश करण्यात आला आहे.

    First published:

    Tags: Olympics 2021