मुंबई, 18 सप्टेंबर : विराट कोहलीनं 2 दिवसांपूर्वी टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर (Virat Kohli Left T20 Captaincy) केला आहे. त्यानंतर उर्वरित फॉर्मेटमध्ये तो किती काळ कॅप्टन राहणार याची चर्चा सुरू झाली आहे. विराट कोहलीला वन-डे आणि टेस्ट टीमचा तर रोहित शर्माला (Rohit Sharma) टी20 टीमचा कॅप्टन करण्याचा प्रयोग जास्त काळ चालणार नाही, असं मत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानं व्यक्त केलं आहे.
बीसीसीआयनं अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लिमिटेड ओव्हर्सच्या टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा हाच टी20 टीमचा कॅप्टन होण्याची शक्यता आहे. वन-डे आणि टी20 या दोन्ही प्रकारात समानता असल्यानं या दोन्ही टीमचा कॅप्टन एकच व्यक्ती असला पाहिजे, असं मत आकाशनं व्यक्त केलं आहे.
मुंबई इंडियन्स होणार नवं सत्ताकेंद्र, 2 दिग्गज सांभाळणार टीम इंडियाची जबाबदारी!
आकाशनं पुढं सांगितलं की, 'विराट जास्त काळ वन-डे टीमचा कॅप्टन राहण्याची शक्यता नाही. कारण टी20 आणि वन-डे टीममध्ये जास्त फरक नाही. या दोन्ही प्रकारात एकाच पद्धतीनं खेळ होतो. त्यात आता जास्त अंतर राहिलेलं नाही. ज्या गोष्टी तुम्ही टी20 मध्ये करता त्याच गोष्टी वन-डे क्रिकेटमध्येही केल्या जातात. दोन्हीकडं खेळाडू देखील एकसारखे आहेत.
भारतीय टीमचा विचार केला तर या टीममध्ये 7 ते 9 खेळाडू एकच आहेत. टी 20 टीममध्ये फार बदल होत नाही. त्यामुळे लांबचा विचार केला तर विराट वन-डे टीमचा कॅप्टन राहणार नाही,' असं मला वाटतं.
टीम इंडियाच्या भावी कोचला रवी शास्त्रींचा गंभीर इशारा, पद सोडण्यापूर्वी म्हणाले...
आकाश चोप्रा पुढं म्हणाला की, 'आगामी वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयनं रोहितला टी20 टीमचं कॅप्टन केलं तर 2023 च्या वर्ल्ड कपसाठी त्यालाच कॅप्टन करावं, कारण एकाच दिशेनं पुढं जाण्याची तुमची इच्छा असेल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.