Home /News /sport /

PAK vs NZ : न्यूझीलंडनं दौरा का सोडला? रावळपिंडीच्या मैदानातील धक्कादायक VIDEO VIRAL

PAK vs NZ : न्यूझीलंडनं दौरा का सोडला? रावळपिंडीच्या मैदानातील धक्कादायक VIDEO VIRAL

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यातील पहिली वन-डे सुरू होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असतानाच न्यूझीलंडनं हा दौरा रद्द (New Zealand abandoned Pakistan Tour) केला. या निर्णयाचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यातील पहिली वन-डे सुरू होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असतानाच न्यूझीलंडनं हा दौरा रद्द (New Zealand abandoned Pakistan Tour) केला. पाकिस्तानमध्ये टीमच्या सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत न्यूझीलंड टीमनं हा दौरा रद्द केला. या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आक्रमक झालं आहे. त्यांनी हे प्रकरण आयसीसीकडं (ICC) नेण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी न्यूझीलंडनं हा दौरा का सोडला? याचा एका धक्कादायक व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) झाला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली वन-डे शुक्रवारी होणार होती. पण मॅच सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमना हॉटेलमध्ये थांबण्याची सूचना मिळाली होती. त्याचबरोबर मैदानात कोणताही प्रेक्षक उपस्थित नव्हता. त्याचवेळी रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं यानंतर एक वक्तव्य प्रसिद्ध करत हा दौरा रद्द केल्याचं जाहीर केलं. 'पाकिस्तानमध्ये आमचे खेळाडू सुरक्षित नाहीत अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही सुरक्षा टीमच्या सल्ल्यानं पाकिस्तानचा दौरा रद्द करत आहोत. आमचे सर्व खेळाडू विशेष विमानानं पाकिस्तानहून मायदेशी परतणार आहेत. आमचा निर्णय हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी धक्कादायक आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही. आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण करावी लागेल. दोन्ही देशांच्या सहमतीनं ही सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे. PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत! पाकिस्तानमध्ये संतापाचं वातावरण पाकिस्तान दौऱ्यात न्यूझीलंडची टीम 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण रावळपिंडीमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडेआधीच न्यूझीलंड टीमने सुरक्षेचं कारण देत आम्ही खेळणार नसल्याचं सांगितलं. न्यूझीलंडने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानी मीडिया आणि त्यांच्या सेलिब्रिटींचा मात्र चांगलाच तीळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराने तर न्यूझीलंडला क्राईस्टचर्चच्या गोळीबाराची आठवण करून दिली. न्यूझीलंडनंतर आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत 2019 साली बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होती, तेव्हा क्राईस्टचर्चच्या मशिदीमध्ये गोळीबार झाला होता आणि 49 जणांचा मृत्यू झाला होता.  बांगलादेशची टीम मशिदीमध्ये नमाजासाठी जाणारच होती, पण त्याच्या काही वेळ आधी गोळीबार झाला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Pakistan

    पुढील बातम्या