जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध टी२०मध्ये कुणाला मिळणार संधी? 'या' खेळाडूंचा होणार पत्ता कट

IND Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध टी२०मध्ये कुणाला मिळणार संधी? 'या' खेळाडूंचा होणार पत्ता कट

IND Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध टी२०मध्ये कुणाला मिळणार संधी? 'या' खेळाडूंचा होणार पत्ता कट

भविष्यातील टी 20 विश्वचषकासाठी भारताचा नवा संघ तयार करण्याच्या दृष्टीने सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड पाऊल उचलत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने देखील स्पष्ट केले होते. त्यामुळे टी २० मालिकेत अधिकाधिक नवीन खेळाडूंना संधी देण्यात येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 13 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वन डे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना उद्या तिरुअनंतरपूरमच्या स्टेडियमवर पार पडणार आहे. या वन डे मालिकेत भारताने दमदार खेळीचे प्रदर्शन करून श्रीलंका विरुद्ध 2-1 ने आघाडी घेतल्यामुळे भारताचा मालिका विजय जवळपास पक्का आहे. वन डे  मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा केली आहे. यानंतर लवकरच आता न्यूझीलंड सोबतच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र यात संघातून दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेत भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चांगली कामगिरी केली होती. विराट श्रीलंकेच्या पहिल्या वन डे सामन्यात त्याचे 73 वे शतक करण्यात यशस्वी ठरला. तर रोहित शर्माने देखील अर्धशतक ठोकले. मात्र असे असतानाही या दोघांना  न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघातून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : धोनीच्या फेव्हरेट खेळाडूकडे न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद; भारत विरुद्ध टी २० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर भविष्यातील टी 20 विश्वचषकासाठी भारताचा नवा संघ तयार करण्याच्या दृष्टीने सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड पाऊल उचलत आहे. याविषयी काही दिवसांपूर्वी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने देखील स्पष्ट केले होते. त्यामुळे टी २० मालिकेत अधिकाधिक नवीन खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. यामुळे टी 20 मध्ये रोहित आणि विराटची कामगिरी उत्तम असूनही त्यांना न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात स्थान देण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी श्रीलंके विरुद्ध टी 20 मालिकेतही रोहित आणि विराटला संघा बाहेर ठेऊन हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान टी 20 मालिकेला 27 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. पहिला टी 20 सामना 27 जानेवारीला  रांची येथे होईल तर दुसरा टी 20 सामना हा 29 जानेवारीला लखनौ येथे होणार आहे. तसेच तिसरा टी 20 सामना हा 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात