मुंबई; 13 जानेवारी : सध्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत 2-0 अश्या आघाडीवर आहे. उद्या श्रीलंके विरुद्ध तिसऱ्या सामन्यानंतर भारताचा वनडे मालिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. भारताने नववर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंके विरुद्ध तीन सामन्यांची टी 20 मालिका 2-1 ने जिंकली होती. या वनडे मालिकेनंतर भारत न्यूझीलंड संघासोबत टी 20 सामन्यांची मालिका खेळणार असून या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत विरुद्ध टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा नुकताच जाहीर करण्यात आला असून धोनीच्या फेव्हरेट खेळाडूकडे न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 27 जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय संघातून न्यूझीलंडच्या प्रमुख संघाचा कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विश्रांती दिली आहे. तेव्हा यांच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. मिचेल सँटनर हा आयपीएलमध्ये एम एस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिचेल सँटनरने अप्रतिम खेळ दाखवला होता. हे ही वाचा : IPL : पंजाब किंग्सच्या खेळाडूने हिंदू कुटुंबाचे केले मुस्लिम धर्मांतर? पाक कर्णधाराच्या वक्तव्याने खळबळ भारता विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी डावखुरा मध्यमगती गोलंदाज बेन लिस्टर आणि हेन्री शिपली यांची संघात निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या युरोपियन दौऱ्यावर स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंड संघात पदार्पण केलेला फिरकी अष्टपैलू मायकेल रिप्पन यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर काइल जेमिसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने आणि बेन सियर्स हे खेळाडू दुखापतीमुळे सध्या संघामधून बाहेर आहेत. भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक : पहिला वनडे सामना - 18 जानेवारी, हैदराबाद दुसरा वनडे सामना - 21 जानेवारी, रायपूर तिसरा वनडे सामना - 24 जानेवारी, इंदूर पहिला टी 20 सामना - 27 जानेवारी, रांची दुसरा टी 20 सामना - २९ जानेवारी, लखनौ तिसरा टी २० सामना - 1 फेब्रुवारी, अहमदाबाद हे ही वाचा : IND VS SL : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘या’ दिग्गज खेळाडूची तब्बेत खालावली भारताविरुद्ध टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, हेन्री शिपले , ईश सोधी , ब्लेअर टिकनर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.