सिडनी, 26 ऑक्टोबर:रविवारी टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव करुन टी20 वर्ल्ड कप मोहिमेला दणदणीत सुरुवात केली. पण टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विननं या सामन्यानंतर एक अजब विधान केलं आहे. अश्विन शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी भारताला विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पण त्याचवेळी पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजनं वाईड बॉल टाकला. त्या वाईड बॉलनंतर अश्विननं देवाचे आभार मानले कारण त्या एका वाईड वॉलनं सामना बरोबरीत आला होता.
यू ट्यूब चॅनेलवरुन अश्विन म्हणाला...
भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की दोन्ही देशांच्या खेळाडूंसाठी तो सामना प्रचंड तणाव देणारा असतो. मेलबर्नच्या मैदानातच त्यावेळी सुमारे नव्वद हजार प्रेक्षक होते. तर जगभरात कोट्यवधी चाहते हा सामना लाईव्ह पाहत होते. त्यात 1 बॉल 2 रन्स अशा तणावाच्या परिस्थितीत अश्विन मैदानात होता. त्यावेळी 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षा त्याच्यावरच होत्या. याच सगळ्या क्षणांचा रोमांच अश्विननं आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितला आहे.
😂😂 @ashwinravi99 na abt Last ball and wide 😂#INDvPAK pic.twitter.com/Ev8ecsaxmR
— Raguvaran Karunakaran (@1991ragu) October 25, 2022
अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'वाइड बॉलनंतर मी स्वतःलाच सांगितलं की माझ्या घरावर कोणीही दगडफेक करणार नाही. पहिला चेंडू त्यानं लेग साइडला टाकला. मला हायसं वाटले. मी स्वतःला म्हणालो, थँक यू. तो वाईड बॉल होता. मी तो खेळला नाही. मी फक्त बॉल विकेट कीपरकडे जाताना पाहिला आणि तो जाऊ दिला. तेव्हा मी स्वतःलाच सांगितलं की माझ्या घरावर कोणी दगडफेक करणार नाही.' त्यानंतर अश्विननं पुढच्या बॉलवर लाँग ऑफच्या दिशेनं फटका खेळला आणि भारतानं पाकिस्तानवर 4 विकेट्सनी दणदणीत मात केली. टीम इंडियानं मेलबर्नमध्ये तिरंगा फडकवला.
Virat Kohli on Ravi Ashwin - how brilliantly Ashwin did it. pic.twitter.com/1BtFrTDXT3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 24, 2022
हेही वाचा - Ind vs Ned: भारत-नेदरलँड सामना किती वाजता सुरु होणार? आताच पाहून घ्या सामन्याची वेळ!
भारताची पुढची लढत नेदरलँडशी
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माची टीम इंडिया आता पुढच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. हे आव्हान आहे नेदरलँडचं. टीम इंडिया आणि नेदरलँड संघातला सुपर 12 फेरीतला सामना गुरुवारी 27 ऑक्टोबरला होणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळवण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: R ashwin, Sports, T20 world cup 2022