जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोहित शर्माचं ठरलं! तिसऱ्या वन डे सामन्यात 'या' स्टार खेळाडूंना नाही देणार संधी

रोहित शर्माचं ठरलं! तिसऱ्या वन डे सामन्यात 'या' स्टार खेळाडूंना नाही देणार संधी

रोहित शर्माचं ठरलं! तिसऱ्या वन डे सामन्यात 'या' स्टार खेळाडूंना नाही देणार संधी

भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा वनडे सामना उद्या 15 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. वन डे सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले असून यात भारताने श्रीलंकेवर मात करून 2-0 ने आघाडी घेतली आहे. जवळपास भारताने ही मालिका जिंकली आहे, मात्र उद्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या वन डे सामन्यानंतर भारताचा विजय निश्चित होईल. तेव्हा या वन डे सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. श्रीलंका विरुद्ध वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा हा संघटित स्टार युवा खेळाडूंना बाहेर बसवण्याची शक्यता आहे. उद्याच्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मधून स्टार खेळाडू शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर बाहेर जाण्याची शक्यता आहे. यांच्या ऐवजी श्रीलंका विरुद्ध दोन्ही वनडे सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेल्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांना प्लेयिंग 11 मध्ये संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच यांसोबतच गोलंदाज यजुवेंद्र चहल याला देखील संधी मिळू शकते. हे ही वाचा : के एल राहुलचा भाऊ पोहोचला शार्क टॅंकमध्ये; पण नाही करू शकला शार्कला इंप्रेस श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, “न्यूझीलंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामने येणार आहेत, त्यामुळे आम्हाला खेळाडूंना फ्रेश ठेवण्याची गरज आहे. भारतीय संघ पुढील काळात बऱ्याच मॅच खेळणार आहे, त्यामुळे आम्हाला सर्वकाही लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आवश्यक असल्यास, आम्ही काही बदल करू. भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा वनडे सामना उद्या 15 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात