लंडन, 15 सप्टेंबर : अॅशेस मालिकेच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला तब्बल 135 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ओव्हलमध्ये झालेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांवर ऑलआऊट झाला. अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडली आहे. इंग्लंडनं दिलेल्या 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा झटका तेव्हा बसला जेव्हा 27वया ओव्हरमध्ये स्मिथची विकेट गेली. या मालिकेत पहिल्यांदा स्मिथ 50 पेक्षा कमी धावा करत बाद झाला.
वाचा- एक खेळाडू डिप्रेशनमध्ये, पाकविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे तीनच फलंदाज खेळणार तत्पूर्वी इंग्लंडचा शनिवारचा 8 बाद 313 धावांवरून पुढे खेळताना दुसरा डाव 329 धावांवर संपुष्टात आला.त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 399 धावांचे अशक्यप्राय असे आव्हान उभे केले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच भरवशाच्या स्मिथला त्याने 23 धावांवर लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरही मिचेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी पाचव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी रचली. मात्र मार्श लगेच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. वाचा- पावसामुळं चाहत्यांचा रविवार गेला वाया, पहिला टी-20 सामना रद्द!
England win the Test match by 135 runs!
— ICC (@ICC) September 15, 2019
The Ashes will go back to Australia but the series is drawn 2-2! pic.twitter.com/ixE513yBTw
चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात 5 बाद 168 अशी अवस्था झाली होती. यातही ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची योग्य साथ मिळाली नाही. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत स्मिथने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. वाचा- आमचा वेळ फुकट घालवण्याचा तुम्हाला काय हक्क, सामना रद्द झाल्यानंतर BCCIची शाळा SPECIAL REPORT: मराठवाड्याचा गड पुन्हा राखण्यासाठी आदित्य ठाकरे लढणार उस्मानाबादमधून निवडणूक?