लंडन, 15 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने पाकिस्तानिविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत फक्त तीनच खेळाडू खेळणार असल्याचे सांगितलं आहे. वॉर्नरसह तीन फलंदाज खेळणं निश्चित असून एक खेळाडू सध्या डिप्रेशनचा सामना करत आहे. वॉर्नर, स्मिथ, लॅब्युशेन हे खेळणं नक्की आहे. तर युवा खेळाडू विल पुकोवस्की डिप्रेशनमध्ये आहे. त्याला 21 नोव्हेंबरपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये संधी द्यायला आवडेल असं पाँटिंगने सांगितलं. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. इतकंच काय त्याला दुहेरी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. पाँटिंग म्हणाला की, व़ॉर्नर ओव्हलवर शेवटच्या कसोटीत दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. तरीही तो संघात कायम राहणार आहे. तर मार्नस लॅब्यूशेन आणि स्मिथ यांचं स्थान पक्कं आहे. पाँटिंगने सांगितलं की, मधल्या फळीत मॅथ्यू वेड आणि ट्रेव्हिस हेड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजीत बदल केला. यामध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून बॅनक्राफ्ट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यांना संघातून बाहेर बसवण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदी टिम पेनला ठेवायला हवं. किमान पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध तरी त्याच्याकडेच नेतृत्व असायला पाहिजे असं पाँटिंग म्हणाला. चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने अॅशेसमधून पुनरागमन केलं आहे. स्टीव्ह स्मिथ फॉर्ममध्ये आहे तर वॉर्नर धावांसाठी झगडताना दिसत आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियाला एकहाती अॅशेस मालिका जिंकून दिली आहे. Under 19 Asia Cup : वडिलांनी जिंकून दिले कारगिल युद्ध, मुलानं टीम इंडियाला केले चॅम्पियन! टीम इंडियाच्या जर्सीवर भारतीय कंपनीचे नाव, एका सामन्यासाठी देणार इतके कोटी! काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.