मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? अखेर BCCI नं दिलं उत्तर

T20 World Cup: हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? अखेर BCCI नं दिलं उत्तर

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेस हा सध्या काळजीचा विषय आहे. त्यामुळे तो आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) बॉलिंग करणार का? हा एक मोठा प्रश्न आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 ऑक्टोबर: टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेस हा सध्या काळजीचा विषय आहे. हार्दिक फिटनेसमुळेच आयपीएलच्या सेकंड हाफमधील तीन मॅच खेळू शकला नव्हता. तसंच त्यानं या हाफमध्ये एकही ओव्हर टाकली नाही. त्यामुळे तो आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) बॉलिंग करणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. निवड समितीनं बुधवारी केलेल्या टीम इंडियातील बदलानंतर या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) एन्ट्री झाली आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे हार्दिक आगामी वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमनं दोन दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट पाहिला. त्या रिपोर्टनंतरच हार्दिक टी20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करण्याची शक्यता नाही, असं त्यांनी बोर्डाला कळवलं. मेडिकल टीमच्या या माहितीनंतर निवड समिताला भारतीय टीममध्ये बदल करणे भाग पडले.

'इनसाईड स्पोर्ट्स'ला बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार, 'हार्दिक आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार नाही. तो बॅटर म्हणून खेळेल. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात तो पूर्ण फिट झाला तर बॉलिंग करेल, पण तो इतक्यात बॉलिंग करणे शक्य नाही. आम्हाला अक्षर पटेलबद्दल (Axar Patel) खेद आहे. पण टीमचं संतुलन राखण्यासाठी आम्हाला अक्षरला वगळून शार्दुल ठाकूरचा समावेश करावा लागला.'

रवी शास्त्रीनंतर द्रविड होणार टीम इंडियाचा कोच! 'या' सीरिजसाठी सांभळणार जबाबदारी

निवड समितीनं मागील महिन्यात टी20 वर्ल्ड कपसाठी टीमची निवड केली होती. त्यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या तीन फास्ट बॉलर्सचा समावेश केला होता. टीममधील चौथा फास्ट बॉलर हार्दिक पांड्या असेल असं मानलं जात होतं. मात्र आयपीएल स्पर्धेत हार्दिकनं बॉलिंग न केल्यानं आता अक्षरला वगळून शार्दुलचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर

First published:

Tags: Hardik pandya, T20 world cup