बंगळुरु, 17 सप्टेंबर**:** भारत अ आणि न्यूझीलंड अ संघांमध्ये सध्या बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर तिसरा अनधिकृत कसोटी सामना सुरु आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतले पहिले दोन्ही सामने ड्रॉ राहिले. त्यात हाही सामना सध्या ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. पण भारतासाठी हा सामना अनेक दृष्टीनं चांगला ठरतोय. ऋतुराज गायकवाडनं या सामन्याच्या दोन्ही डावात दमदार फलंदाजी केली. तर दुसरीकडे मध्य प्रदेश कडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या रजत पाटीदारची बॅटही चांगलीच चालली. पाटीदारचं आणखी एक शतक रजत पाटीदारनं डोमेस्टिक क्रिकेटमधला आपला फॉर्म कायम ठेवताना आणखी एक शतक ठोकलं. पहिल्या डावात 30 धावांवर बाद झालेल्या रजतनं दुसऱ्या डावात मात्र शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्या दिवसअखेर 400 धावांची आघाडी घेता आली. पहिल्या डावात 293 धावा केल्यानंतर भारतानं न्यूझीलंड अ संघाला 237 धावात गुंडाळलं. त्यानंतर आज तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 342 धावांची मजल मारली होती. त्यात पाटीदारची नाबाद 109 धावांची खेळी खास ठरली.
Rajat Patidar's stellar run for India A continues as he got to his 2️⃣nd century against NZ A, scoring 1️⃣0️⃣9️⃣*(135) in the 2nd innings at the Chinnaswamy Stadium. 🔥
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 17, 2022
Well played, Champ! 🙌🏻#PlayBold #TeamIndia #INDAvNZA pic.twitter.com/14g3s0M6zH
हेही वाचा - Mumbai Indians: पाहा मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांची नवी ‘पलटन’, गाजवणार यूएईचं रणांगण 2022 पाटीदारसाठी सर्वात खास रजत पाटीदारसाठी यंदाचं वर्ष खास ठरलं. आयपीएलमध्ये त्यानं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात अंतिम क्षणी जागा मिळवली. आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये त्यानं शतक ठोकलं. त्यानंतरच सर्वांच्या नजरा पाटीदारकडे वळल्या. आयपीएलनंतर रणजी ट्रॉफी फायनलमध्येही रजत पाटीदारनं मध्य प्रदेशसाठी महत्वाची खेळी केली. त्यानं 41 वेळा रणजी करंडक जिंकलेल्या मुंबईविरुद्ध शतक ठोकलं आणि संघाला पहिल्यांदा रणजी विजेतेपद मिळवून दिलं. याच महिन्यात त्यानं भारत अ संघाकडून पदार्पण केलं. आणि पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 176 धावा फटकावल्या. आणि आज पुन्हा एकदा तीन सामन्यात दुसऱ्यांदा शतकी खेळी केली.