जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / श्रीलंके विरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया पोहोचली पद्मनाभस्वामी मंदिरात; पहा PHOTOS

श्रीलंके विरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया पोहोचली पद्मनाभस्वामी मंदिरात; पहा PHOTOS

श्रीलंके विरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया पोहोचली पद्मनाभस्वामी मंदिरात; पहा PHOTOS

तिरुअनंतपूरम मध्ये तिसऱ्या वनडे सामन्यासाठी आलेल्या भारतीय संघाने श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी संघातील काही खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ देखील उपस्थित होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज वनडे मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. हा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होणार असून या सामन्यासाठी शुक्रवारी भारतीय संघ केरळच्या तिरुअनंतपुरम येथे पोहोचला. यावेळी संघाचे स्थानिक प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. सामन्याच्या सरावातून वेळ काढत भारतीय संघातील काही खेळाडूंनी प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

team india in south temple

वनडे मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या दोन विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जवळपास खिशात घातली आहे. यापूर्वी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिकेत देखील भारताने श्रीलंकेवर 2-1 ने विजय मिळवून मालिका विजय प्राप्त केला होता. हे ही वाचा :  IND VS SL : तिसरा वनडे सामन्यातही भारत पडणार श्रीलंकेवर भारी? कधी, कुठे पाहाल सामना? तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रॅक्टिस सेशनमध्ये घाम गाळत असल्याचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

News18

तिरुअनंतपूरम मध्ये तिसऱ्या वनडे सामन्यासाठी आलेल्या भारतीय संघाने श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी संघातील काही खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ देखील उपस्थित होते. यावेळी खेळाडूंनी मंदिरात येऊन दर्शन घेत पूजा देखील केल्याची माहिती आहे. सध्या समोर येत असलेल्या फोटोंमध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ हे केरळच्या पारंपरिक वस्त्र परिधान केलेले पहायला मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात