मुंबई : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांची मालिका आणि टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक खेळाडू बाहेर आहेत, या दोन्ही टीमविरुद्ध खेळण्यासाठी टीममध्ये वेगळे चेहरे पाहायला मिळणार आहेत न्यूझीलंड विरुद्ध 18 जानेवारीपासून 3 वन डे सामन्यांची मालिक सुरू होणार आहे. यामध्ये के एल राहुल उपलब्ध नसल्याने के एस भरतला संधी देण्यात आली आहे. तो विकेटकीपर म्हणून असेल. शाहबाज अहमदला अक्षर पटेलच्या जागी खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय क्रिकेटरचं निधन; शेवटच्या सामन्यात घेतलेल्या ५ विकेटसंजू सॅमसनला दुखापतीमुळे खेळता येणार नाही. त्याच्या जागी जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार देखील टीममध्ये खेळताना दिसणार आहेत. हार्दीक पांड्याकडे कर्णधारपद आणि सूर्यकुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील टीममध्ये नसणार आहेत. रविंद्र जडेजा टेस्ट टीमचा भाग आहे मात्र अजूनही त्याला फिटनेस टेस्ट द्यायची आहे. टेस्ट टीमचे उपकर्णधार के एल राहुल असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार आहे.
Under 19 WC : महिलांचा टी20 वर्ल्ड कप उद्यापासून, भारताची मॅच कधी? जाणून घ्यान्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी टीम हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरन मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार ऑस्ट्रेलिया विरुद्घ टीम इंडियाची निवड रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव