मुंबई, 12 सप्टेंबर**:** ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी आज भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात यंदाचा टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयची निवड समिती आज संघनिवड करणार असल्याची माहिती आहे. त्याची घोषणाही आजच होईल असा अंदाज आहे. आशिया चषकातल्या भारताच्या अपयशानंतर वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीचं कमबॅक होणार**?** आशिया चषकासाठीच्या भारतीय संघातून स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला वगळण्यात आलं होतं. त्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. पण वर्ल्ड कपसाठीच्या संघात शमी हवा अशी मागणी अनेक माजी क्रिकेटर्सनी केली होती. शमीची आजवरची कामगिरी पाहता आणि आशिया चषकात शमीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं झालेलं नुकसान पाहता शमीचा 15 सदस्यीय संघात समावेश होण्याची शक्यता जास्त आहे. बुमरा-हर्षल फिट आशिया चषकाआधी जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेलच्या रुपात भारताला मोठा धक्का बसला होता. दुखातीमुळे हे दोन्ही खेळाडू संघाबाहेर गेले होते. पण बुमरा आणि हर्षल पटेल आता पूर्णपणे फिट झाले असून पुनरामनासाठी सज्ज आहेत. हेही वाचा - T20 World Cup: रवींद्र जाडेजाची जागा कोण घेणार? रोहित शर्माकडे आहे ‘हा’ सर्वोत्तम पर्याय जाडेजाच्या जागी अक्षर पटेल****? आशिया चषकात जाडेजाला दुखापत झाली तेव्हा अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपसाठीही अक्षर पटेल हाच जाडेजासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. अक्षर पटेलनं गेल्या काही मालिकांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे अक्षर पटेलचा विश्वचषक संघात समावेश होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. पटेलनं आतापर्यंत 26 टी20 सामन्यात 21 विकेट्स आणि 147 धावा अशी कामगिरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







