मुंबई, 01 जानेवारी : 2022 या वर्षात टीम इंडियाला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये निराशेचा सामना करावा लागला. बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या टीम इंडियाला आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचता आलं नव्हतं. तर टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता. आता नव्या वर्षात भारतीय संघ पुन्हा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी करत आहे. 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानतंर भारताने अद्याप कोणत्याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप जिंकलेला नाही. 2023 मध्ये भारतीय संघ भरपूर एकदिवसीय सामने खेळणार आहे. वनडे वर्ल्ड कपची तयारी म्हणून याकडे पाहिले जात आहे. भारत - श्रीलंका नव्या वर्षात भारत आणि श्रीलंका यांच्यात 4 एकदिवसीय आणि 4 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. 3 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत टी20 सामने तर 10 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. भारत - न्यूझीलंड जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल. 18 जानेवारीला यातला पहिला सामना होईल तर 24 जानेवारीला अखेरचा सामना होईल. त्यानंतर 27 जानेवारीला पहिला टी20 सामना आणि 1 फेब्रुवारीला तिसरा टी20 सामना होणार आहे. हेही वाचा : ऋषभ पंतची ड्रीम कार होती i20, आता ताफ्यात आहेत आलिशान गाड्या भारत - ऑस्ट्रेलिया श्रीलंका, न्यूझीलंड यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असेल. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशपमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत चार कसोटी सामने होणार आहेत. तर 17 ते 22 मार्च या कालावधीत तीन एकदिवसीय सामने होतील. आयपीएल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आधी आय़पीएलसाठी 50 ते 60 दिवसांची विंडो मिळणार आहे. या कालावधीतच आयपीएल 2023 चे आयोजन होणार आहे. याचे शेड्युल अद्याप आले नसले तरी मार्च अखेर ते मे महिन्यात ही स्पर्धा होऊ शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाचे फायनलमधील स्थान जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या स्थानावर सध्या भारतीय संघ आहे. दुसरं स्थान भक्कम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताला महत्त्वाची असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलम जून 2023 मध्ये होणार आहे. हेही वाचा : रोनाल्डोसोबत करारानंतर २४ तासात अल नस्र क्लबला झाला मोठा फायदा टी २० वर्ल्ड कप भारतीय संघ जुलै आणि ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. 2024 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे भारताचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने होणार आहे. या मालिकेचे शेड्युल अद्याप आलेले नाही. आशिया कप वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये आशिया कप होणार आहे. याचे यजमानपद पाकिस्तानकडे असून यावरून वाद सुरू आहे. टीम इंडियाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिला असल्याचं बीसीसीआय सचिव जय शहा यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. सप्टेंबरनंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे तीन एकदिवस सामने होणार आहेत. एकदिवसीय वर्ल्ड कप आधी दोन्ही संघांची ही अखेरची मालिका असेल. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मोठा उत्सव असणार आहे. पहिल्यांदाच भारत एकटा एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहे. 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानतंर भारत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणार का? याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना असणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ तीनवेळा भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध एक दोन नव्हे तर तीन वेळा भारतात खेळणार आहे. वर्ल्ड कपनंतर दोन्ही देशात पाच टी20 सामने होतील. 2024च्या टी 20 वर्ल्ड कप आधी हा दौरा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहे. याशिवाय भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. हेही वाचा : पंतपासून सूर्यकुमारपर्यंत कोण ठरलं टॉप? BCCIने जारी केलं 2022चं रिपोर्ट कार्ड भारतीय महिला क्रिकेट संघाचे शेड्युल भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत ट्राय सिरीजमध्ये महिला टी२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून उतरेल. ही मालिका 19 ते 30 जानेवारी दरम्यान होणार आहे. टी20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप टी20 महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे दक्षिण आफ्रिकेत आयोजन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारीपासून हा वर्ल्ड कप सुरू होणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हा वर्ल्ड कप असणार आहे. महिला आयपीएलचे आयोजन भारतात महिला क्रिकेटला मोठा बूस्ट मिळणार असून महिला आयपीएलचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम मार्च 2023 मध्ये होणार आहे. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ जून-जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर न्यूझीलंडचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यातही तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांची मालिका होईल. महिला संघाची एकमेव कसोटी वर्षाअखेरीस भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. यात तीन टी20 सामने आणि वर्षातील एकमेव अशा कसोटी सामन्याचा समावेश असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.