मुंबई, 01 जानेवारी : सौदी अरेबियातील क्लब अल नस्रने रोनाल्डोसोबत वार्षिक 1800 कोटी रुपयांचा करार केला. फुटबॉलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा करार ठरला. दरम्यान, या करारानंतर 24 तासातच अल नस्र क्लबला मोठा फायदा झाला आहे. लोकप्रिय असलेला रोनाल्डो क्लबशी जोडला गेल्यानंतर क्लबच्या लोकप्रियतेतही भर पडत आहेत. सोशल मीडियावर 24 तासात अल नस्रचे फॉलोअर्स अनेक पटींनी वाढले आहेत. रोनाल्डोसोबत कराराची घोषणा होण्याआधी अल नस्रचे फॉलोअर्स साडे आठ लाख इतके होते. आता ही संख्या वाढून 50 लाखांच्या वर पोहोचली आहे. रोनाल्डोने अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अल नस्रसोबत करार केला आहे. तो 2025 पर्यंत या क्लबमधून खेळेल. यावेळी त्याची सॅलरी वार्षिक 200 मिलियन म्हणजेच जवळपास 1800 कोटी इतकी असेल. रोनाल्डो पहिल्यांदाच एखाद्या आशियाई क्लबसोबत खेळणार आहे. याआधी त्यांने एक दशक युरोपातील क्लब फुटबॉलमध्ये अधिराज्य गाजवलं आहे. हेही वाचा : ऋषभ पंतची ड्रीम कार होती i20, आता ताफ्यात आहेत आलिशान गाड्या रोनाल्डो जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे आणि त्याच्या लोकप्रियतेचा फायदा आता अल नस्र क्लबला होत आहे. रोनाल्डोसोबत करारानतंर अल नस्रच्या फॉलोअर्समध्ये वेगाने वाढ होत आहे. रोनाल्डोने म्हटलं की, मी एका वेगळ्या देशात एका नव्या फुटबॉल लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. ज्या पद्धतीने अल नस्र काम करत आहे ते खूप प्रेरणा देणारे आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत या क्लबशी जोडला गेल्यानंतर आनंदी आहे. आम्ही मिळून संघाला जास्ती जास्त यश मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हेही वाचा : पंतपासून सूर्यकुमारपर्यंत कोण ठरलं टॉप? BCCIने जारी केलं 2022चं रिपोर्ट कार्ड अल नस्रने सौदी अरब लीगची 9 विजेतेपदं पटकावली आहेत. 2019 मध्ये अल नस्रने शेवटचं विजेतेपद मिळवलं होतं. रोनाल्डो म्हणाला की, पुरुष आणि महिलांच्या फुटबॉलमध्ये सौदी अरेबियात अल नस्र जबरदस्त काम करत आहे. खेळाचा विकास करण्यात या क्लबचे चांगले योगदान आहे अशा शब्दात क्लबचे कौतुकही रोनाल्डोने केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.