मुंबई, 01 जानेवारी : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला रुर्कीजवळ अपघात झाला. यात पंत गंभीर जखमी झाला. ऋषभ पंत त्याच्या आईला भेटण्यासाठी रुर्कीला निघाला होता. पहाटेच्या वेळी त्याची कार महामार्गावर दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला. यानंतर आग लागून त्याची कार जळून खाक झाली. दिल्लीहून रुर्कीला ऋषभ पंत त्याच्या मर्सिडीज AMG GLC 43 Coupe या कारने निघाला होता. या कारची किंमत 88 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मर्सिडीजच्या टॉप कॅटेगरीतील ही गाडी मानली जाते. पण पंतच्या ताफ्यात केवळ हीच एक महागडी गाडी आहे असं नाही. ऋषभ पंतने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हा i20 ही त्याची ड्रीम कार होती. i20 कार खरेदी करायचं त्याचं स्वप्न होतं. पण आता त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. हेही वाचा : पंतपासून सूर्यकुमारपर्यंत कोण ठरलं टॉप? BCCIने जारी केलं 2022चं रिपोर्ट कार्ड ऋषभ पंत सुरुवातीपासूनच महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे फोर्ड मस्टँगपासून ते रेंज रोव्हर या गाड्या आहेत. मर्सिडीज आणि मस्टँगशिवाय त्याच्याकडे ऑडी ए8ची सुपर लग्झरी कारही आहे. फोर्ड मस्टँगचं इंजिन हाय एंड लग्झरी कार्समध्ये आहे. या कारची किंमत भारतात जवळपास 75 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कोट्यवधीपर्यंत जाते. याशिवाय पंतकडे रेंज रोव्हर स्पोर्ट कारही आहे. ही कार एसयुव्ही कॅटगरीत येते. या कारची सुरुवातीची किंमत भारतात जवळपास एक कोटी रुपये इतकी आहे. पंतकडे ऑडी ए 8 मॉडेलची कार आहे. ऑडीच्या या सेडान लग्झरी कारचं टॉप स्पीड 250 किमी प्रति तास इतकं आहे. भारतात या कारची किंमत दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. मर्सिडीज बेंझ सी क्लास ही कारही ऋषभ पंतकडे असून या कारचा वेग प्रति तास 245 इतका आहे. या कारमध्ये 1496 सीसीचे इंजिन आहे. हेही वाचा : हेही वाचा : ऋषभ पंत दारू पिऊन कार चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी दिली मोठी महिती भारतीय क्रिकेट संघात यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडणारा ऋषभ पंत आय़पीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. याशिवाय काही कंपन्यांसाठी एंडॉर्समेंही करतो. ऋषभ पंतची एकूण संपत्ती 100 कोटी इतकी असल्याचं म्हटलं जातंय. पंतने फक्त आयपीएलमधून 80 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला सॅलरी मिळते. त्याचे रुर्की, डेहराडून, हरिद्वार आणि दिल्लीत घर आहे. याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांसाठी जाहिरात करून त्यातूनही पंत कमाई करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.