सध्या क्रिकेटपटूंना सतत क्रिकेट खेळावे लागत आहे. परिणामी त्यांच्या फिटनेसवर याचा थेट परिणाम होतो. त्यामुळं खेळाडूंना बऱ्याचवेळा दुखापतींना सामोरे जावे लागते.
या सगळ्याला कंटाळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वी 2021 टी -20 वर्ल्ड कपनंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पहिल्यांदा कोहलीनं निवृत्तीचे संकेत दिले.
फक्त कोहलीच नाही तर हे तीन खेळाडूही तणावामुळं लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात. सततच्या क्रिकेटमुळे गेले काही महिने भारताचे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे खेळाडू सततच्या क्रिकेटमुळं विराटप्रमाणे एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.
रोहित शर्मानं 2019मध्ये केवळ 1-2 सामन्यात विश्रांती घेतली. त्यामुळं सततच्या क्रिकेट खेळण्यामुळं रोहितच्या खेळावरही त्याचा परिणाम झाला आहे. रोहितलं श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेत त्यानं खेळण्यास सुरुवात केली. आता रोहित जखमी असल्यामुळं सध्या संघाबाहेर आहे.
विराटप्रमाणे रोहितही सतत क्रिकेट खेळत आहे. 2023 वर्ल्ड कपपर्यंत रोहित 36 वर्षांचा होईल. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कप 2021नंतर रोहित कोणत्या तरी एका फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.
रोहितप्रमाणेच भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळं संघाबाहरे आहे. सप्टेंबर 2018नंतर हार्दिकनं एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आता हार्दिक कधी कमबॅक करेल, याबाबत शाश्वतीही नाही.
हार्दिकही 2019मध्ये सतत क्रिकेट खेळला आहे. मुख्यत: टी-20 क्रिकेट जास्त खेळल्यामुळं हार्दिकच्या शरीरावर ताण आला होता. त्यामुळं त्याला तीन-चार महिने क्रिकेट खेळता आले नाही. हे सगळे पाहता हार्दिक लवकरच कोणत्या तरी एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
भारताचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह यानं दुखापतीनंतर न्यूझीलंड दौऱ्यात कमबॅक केला. मात्र बुमराहला चांगली खेळी करता आली नाही. वर्ल्ड कप 2019नंतर बुमराहनं 5 टी-20 सामने खेळले. त्यानंतर तो जखमी झाला.
कसोटी क्रिकेटमध्ये जास्त सामने बुमराहला खेळता आलेले नाही त्यामुळं 2021 टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी बुमराह कसोटीमधून निवृत्ती घेऊ शकतो.