मुंबई, 8 ऑक्टोबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तसा तो सोशल मीडियात फारसा अॅक्टिव्ह नसतो. पण सध्या त्याची बरीच चर्चा आहे. नुकतचा आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सचा ‘थाला’ महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी रात्री चेन्नई एअरपोर्टवरुन बाहेर पडताना कॅमेरॅत कैद झाला. सीएसकेनं सोशल मीडियात माहीचे हे फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी धोनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह टेनिस कोर्टवरही दिसला होता. आयपीएलच्या इतिहासात चार वेळा सीएसकेला विजेतेपद मिळवून देणारा धोनी चेन्नई एअरपोर्टवर सफेद रंगाचा शर्ट आणि काळा मास्क लावून बाहेर पडताना दिसला. याआधीही आयपीएलच्या आगामी मोसमाआधी धोनी अनेक वेळा चेन्नईत आल्याचं पाहायला मिळालं. जाहिरातींच्या शूटींगमध्ये व्यस्त माही आगामी टी20 वर्ल्ड कपच्या आधी महेंद्रसिंग धोनी अनेक जाहिरांतींमध्ये पाहायला मिळतोय. तर अजूनही तो बऱ्याच जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी धोनीनं फेसबुकवर लाईव्ह येण्याची घोषणा केली होती. त्यावेळी अनेकांना असं वाटलं की धोनी आयपीएलसंदर्भात काहीतरी मोठी घोषणा करेल. पण त्यानं एका कूकीज ब्रॅंडचं रिलॉन्चिंग करत अनेकांना धक्का दिला होता. इतकच नव्हे तर त्या लॉन्चिंगचं कनेक्शन आगामी टी20 वर्ल्ड कपशी जोडलं होतं. काही दिवसांपूर्वी धोनीनं सचिनसह एका जाहिरातीचं शूटिंग केलं आहे. तर त्याआधी तो सिक्सर किंग युवराज सिंगसह एका जाहिरातीचं शूट करताना दिसला होता.
Touchdown Anbuden! Unexpected #ThalaDharisanam to make our day! 🦁💛#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/pckvhqSnT8
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 7, 2022
हेही वाचा - T20 World Cup: ‘तो’ नाही पण ‘ती’ मात्र पोहोचली ऑस्ट्रेलियात, चाहते म्हणाले… ‘आम्ही तुझ्या…’ आयपीलएल 2023 मध्ये खेळणार धोनी दरम्यान आयपीएलच्या सोळाव्या सीझनमध्येही माहीची जादू चाहत्यांना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्स मॅनेजमेंटनं धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं सांगितलं होतं. या महान विकेट किपर बॅट्समन आणि कॅप्टन कूलनं आयपीएलच्या गेल्या मोसमात 14 मॅचमध्ये 232 धावा केल्या होत्या. सीएसकेची टीम त्या आयपीएलमध्ये प्ले ऑफसाठी पात्र ठरली नाही. त्याच मोसमात धोनीनं पहिल्या काही सामन्यात रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद दिलं. पण त्यानंतर जाडेजा दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर धोनी पुन्हा सीएसकेचा कॅप्टन बनला