दुखापतीमुळं संपणार भारताच्या स्टार खेळाडूचे करिअर? न्युझीलंड दौऱ्यातून घेतली माघार

दुखापतीमुळं संपणार भारताच्या स्टार खेळाडूचे करिअर? न्युझीलंड दौऱ्यातून घेतली माघार

गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी खेळाडूंची दुखापत चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यात आता आणखी एक खेळाडूनं माघार घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत भारताने शानदार कामगिरी केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारतानं न्यूझीलंडला त्यांच्याच घरात नमवलं. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ 3 एकदिवसीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. मात्र कसोटी मालिका सुरू होण्याआधीच टीम इंडियाचा मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. कसोटी संघातून हार्दिक पांड्या बाहेर पडला आहे.

वाचा-कोहलीच्या रॉकेट थ्रोने किवींच्या तोंडचा घास पळवला, 'त्या' रनआऊटने बदलला सामना

शस्त्रक्रियेनंतर पांड्या सामन्यासाठी आपली फिटनेस पूर्णपणे सिद्ध करू शकला नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 26 वर्षीय पांड्याला सर्जरी करावी लागली होती. ज्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून माघारी परतू शकेल अशी अपेक्षा होती. परंतु हे होऊ शकले नाही आणि आता तो बेंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकॅडमीतमध्ये (NCA) सराव करत राहणार आहे. पांड्या एनसीएचे प्रमुख फिजिओ आशिष कौशिश यांच्यासमवेत लंडनला गेला होता. तेथे स्पायनल सर्जन डॉ. जेम्स लेबन यांच्या दुखापतीचा आढावा घेण्यात आला.

वाचा-भारत-पाक महामुकाबला! U19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये या दिवशी आमने-सामने

हार्दिक पंड्या आयपीएलमधून करणार कमबॅक

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, पांड्या आता आयपीएलमधून क्रिकेटमध्ये परतणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याच्या परतीसाठी आणखी वेळ लागू शकेल. याचाच अर्थ पांड्या आता भारत-दक्षिण आफ्रिके यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेलाही मुकू शकतो.

वाचा-सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका

पहिला कसोटी-वेलिंग्टन 21 ते 25 फेब्रुवारी

दुसरा कसोटी-क्राईस्ट चर्च 29 ते 4 मार्च

First published: February 1, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या