वेलिंग्टन, 01 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सुपरओव्हरमध्ये भारताने न्यूझीलंडला धूळ चारत पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0ने आघाडी घेतली आहे. त्यामुळं न्यूझीलंडला क्लिन स्विप देण्यासाठी भारताला एका विजयाची गरज आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा सामना रविवारी, 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जलद गोलंदाज शार्दुल ठाकूरने 20व्या ओव्हरमध्ये भेदक मारा करत सामना सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेला. मात्र त्याआधी विराट कोहलीने सुपर थ्रो करत केलेला रनआऊट सामन्याचे चित्र बदलणारा होता. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज कोलिन मुनरोची विकेट विराटच्या रनआऊटने घेतली. हा सुपर थ्रो सर्वांच्या लक्षात राहिला. प्रथम फलंदाजी करताना चौथ्या टी -20 सामन्यात भारताने 20 षटकांत 8 बाद 165 धावा केल्या. न्यूझीलंडनेही 20 षटकांत 7 गडी गमावून 165 धावा केल्या. निर्धारित षटकात सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर सामना सुपर ओव्हरने निश्चित केला. वाचा- केएल राहुलने दिलेला सल्ला महत्वाचा, विराटने सांगितलं जिंकण्यामागचं रहस्य
वाचा- सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी विराटच्या शानदार थ्रोवर मनरो रनआऊट सलामीवीर कॉलिन मुनरो व तिसरा नंबरचा फलंदाज टिम सेफर्ट जबरदस्त फलंदाजी करीत होते. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली होती. किवी संघाची धावसंख्या 11.3 ओव्हरमध्ये 96 धावा केल्या होत्या. मुनरोने 46 चेंडूंत 64 धावांवर खेळत होता. मुनरोने शिवम दुबे हद्दीच्या दिशेने खेळला आणि एकापाठोपाठ दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला. शार्दुलने थ्रो फेकला, जो विराटनं आपल्या हातात घेत स्टम्पकडे न बघता थ्रो केला, आणि मुनरो धावबाद झाला. वाचा- सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार

)







