मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी

सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी

गेल्या एक वर्षात न्यूझीलंडला चौथ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यात भारताविरुद्ध सलग दोन सामन्यात सुपर ओव्हचा थरार रंगला.

गेल्या एक वर्षात न्यूझीलंडला चौथ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यात भारताविरुद्ध सलग दोन सामन्यात सुपर ओव्हचा थरार रंगला.

गेल्या एक वर्षात न्यूझीलंडला चौथ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यात भारताविरुद्ध सलग दोन सामन्यात सुपर ओव्हचा थरार रंगला.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 31 जानेवारी : गेल्या एक वर्षात न्यूझीलंडला चौथ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यात भारताविरुद्ध सलग दोन सामन्यात सुपर ओव्हचा थरार रंगला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. यानंतर आता न्यूझीलंडच्या संघावर सुपर ओव्हरमध्ये पराभूत होणारा संघ असा शिक्काच मारला जात आहे.

न्यूझीलंडचा संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत होत असताना समालोचक इयान स्मिथ हे पुन्हा चर्चेत आले आहेत. याआधी तीनवेळा न्यूझीलंडच्या सुपर ओव्हर मधील पराभवावेळी तेच समालोचन करत होते. आता त्यांचा एक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. गेल्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार सुरु असताना इयान स्मिथ म्हणाले होते की, हीसुद्धा सुपर ओव्हर टाय झाली तर मी निवृत्ती घेईन. मी माझ्या आयुष्यातील बराच काळ संपून गेला आहे. तरीही आता मला चांगलं वाटतं आहे आणि हे मला आवडत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथा सामनाही तिसऱ्या सामन्यासारखाच सुपर ओव्हरपर्यंत रंगला. अखेरच्या षटकात विजयासाठी 7 धावा हव्या असताना भारताचा गोलंदाज शार्दुल ठाकुरने रॉस टेलरला पहिल्याच चेंडूवर झेलबादग केलं. त्यानंतर टिम सैफर्टनं चौकार मारला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर चोरटी धाव घेणं टिम सेफर्टला महागात पडलं आणि तो धावबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मिशेल सँटनरने एक धाव घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मिशेल झेलबाद झाला. तर सहाव्या चेंडूवर एकच धाव करता आली.

सुपर ओव्हरमध्ये भारताने जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू दिला. पहिल्या चेंडूवर सेफर्टने एक धावा काढली, यावेळी श्रेयस अय्यरनं कॅच सोडला. तर दुसऱ्या चेंडूवर सेफर्टने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर बुमराहच्या शॉट बॉलवर सेफर्टला बाद करण्याची संधी होती. मात्र केएल राहुलनं हा कॅच सोडला. चौथा चेंडूवर वॉशिग्टन सुंदरने सीमारेषेवर चांगला कॅच घेतला. पाचव्या चेंडूवर रॉस टेलरने चौकर मारला. सहाव्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यामुळं भारताला 14 धावांचे आव्हान मिळालं.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये दिलेल्या 14 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुलने पहिल्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्यानंतर विराटने चौथ्या चेंडूवर दोन आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. यासह मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली.

सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार

First published:

Tags: Cricket, New zealand