नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारताचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल रंगणार आहे. भारताने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम चार जणांमध्ये स्थान पटकावलं आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांमध्ये मंगळवारी चार फेब्रुवारीला हा सामना होणार आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा सामना सुरु होईल. यातील दुसरी सेमीफायनल गुरुवारी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. यातील 14 भारताने तर 8 पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर गोलंदाजांमध्ये रवि बिश्नोई चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक 9 वेळा आमने सामने आले आहेत. यात 4 वेळा पाकिस्तान तर 5 वेळा भारताने विजय मिळवला आहे. गेल्या तीन सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं आहे. पाकिस्तानच्या संघाने 23 जानेवारी 2010 मध्ये भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं. वाचा : केएल राहुलने दिलेला सल्ला महत्वाचा, विराटने सांगितलं जिंकण्यामागचं रहस्य आतापर्यंत भारताने वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने स्कॉटलंड, झिम्बॉम्बे, अफगाणिस्तान यांना पराभूत केलं आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागला नाही. सुपर ओव्हर म्हणजे डोक्याला ताप, ICC ने VIDEO शेअर करत घेतली फिरकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







