मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : हे गेलच करू शकतो! Universe Boss ने ज्याची विकेट घेतली त्यालाच मारली मिठी, VIDEO

T20 World Cup : हे गेलच करू शकतो! Universe Boss ने ज्याची विकेट घेतली त्यालाच मारली मिठी, VIDEO

क्रिस गेल (Chris Gayle) त्याच्या मैदानातल्या आक्रमक बॅटिंगसोबतच हटके सेलिब्रशनसाठीही ओळखला जातो. टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (West Indies vs Australia) सामन्यातही गेलने अशाच प्रकारे भन्नाट सेलिब्रेशन केलं.

क्रिस गेल (Chris Gayle) त्याच्या मैदानातल्या आक्रमक बॅटिंगसोबतच हटके सेलिब्रशनसाठीही ओळखला जातो. टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (West Indies vs Australia) सामन्यातही गेलने अशाच प्रकारे भन्नाट सेलिब्रेशन केलं.

क्रिस गेल (Chris Gayle) त्याच्या मैदानातल्या आक्रमक बॅटिंगसोबतच हटके सेलिब्रशनसाठीही ओळखला जातो. टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (West Indies vs Australia) सामन्यातही गेलने अशाच प्रकारे भन्नाट सेलिब्रेशन केलं.

पुढे वाचा ...

अबु धाबी, 6 नोव्हेंबर : युनिव्हर्स बॉस म्हणून जगभरात ओळख मिळवलेला क्रिस गेल (Chris Gayle) त्याच्या मैदानातल्या आक्रमक बॅटिंगसोबतच हटके सेलिब्रशनसाठीही ओळखला जातो. टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (West Indies vs Australia) सामन्यातही गेलने अशाच प्रकारे भन्नाट सेलिब्रेशन केलं. क्रिस गेलने या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) याची विकेट घेतली, पण ही विकेट घेतल्यानंतर गेल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत जल्लोष करण्याऐवजी थेट मिचेल मार्शजवळ गेला आणि त्याने मार्शला मिठी मारली. गेलचं हे सेलिब्रेशन पाहून मार्शलाही हसू आवरलं नाही. 32 बॉलमध्ये 53 रन करून मार्श आऊट झाला. जेसन होल्डरने मार्शचा कॅच पकडला. डोक्यात टोपी आणि डोळ्याला गॉगल लावून गेल या सामन्यात बॉलिंग करत होता.

क्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा अखेरचा सामना असण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने क्रिस गेलला बोल्ड केलं, यानंतर डग आऊटच्या दिशेने जाताना गेलने प्रेक्षकांच्या दिशेने बॅट उंचावली, यानंतर वेस्ट इंडिज टीममधल्या त्याच्या सहकाऱ्यांनी गेलसाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या, यावरून गेल वेस्ट इंडिजसाठी अखेरचा सामना खेळल्याचं बोललं जात आहे. गेलशिवाय ड्वॅन ब्राव्होसाठीही हा शेवटचा सामना होता. ब्राव्होने आधीच या टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण निवृत्त होणार असल्याचं घोषित केलं होतं.

पोलार्डने मारला Bullet Shot, शेवटच्या सामन्यात थोडक्यात वाचला ब्राव्होचा जीव, Shocking VIDEO

सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची यंदाच्या वर्ल्ड कपमधली कामगिरी निराशाजनक झाली. सुपर-12 राऊंडमध्ये वेस्ट इंडिजला 5 पैकी फक्त एकच सामना जिंकता आला, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलचं आव्हान आधीच संपुष्टात आलं.

विश्वविक्रमवीर गेल

42 वर्षांचा क्रिस गेल टी-20 क्रिकेटमधला सगळ्यात महान खेळाडू गणला जातो. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 14 हजारांपेक्षा जास्त रन आहेत, याशिवाय त्याने 22 शतकंही केली आहेत. अन्य कुठल्या खेळाडूला 9 शतकांचा आकडाही गाठता आलेला नाही. या 22 शतकांपैकी 16 शतकांनंतर गेलच्या टीमचा विजय झाला. गेलने टी-20 मधली 12 शतकं आशिया खंडात लगावली. वनडेमध्येही त्याच्या नावावर 10 हजारांपेक्षा जास्त रन आहेत. टेस्टमध्येही त्याने 333 रनची खेळी केली.

टी-20 मध्ये सगळ्यात जलद शतक करण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. 2013 आयपीएलमध्ये गेलने आरसीबीकडून खेळताना पुण्याविरुद्ध 30 बॉलमध्येच शतक ठोकलं होतं. त्या सामन्यात गेलने नाबाद 175 रनची खेळी केली होती. टी-20 च्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी खेळी होती. टी-20 फॉरमॅटमध्ये गेलने 1500 पेक्षा जास्त सिक्स आणि 3 हजारांपेक्षा जास्त फोर मारल्या आहेत.

T20 World Cup : एका युगाचा अंत! टी-20 ला ओळख देणारे गेल-ब्राव्हो खेळले अखेरचा सामना

First published:

Tags: Chris gayle, T20 world cup, West indies