मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : पोलार्डने मारला Bullet Shot, शेवटच्या सामन्यात थोडक्यात वाचला ब्राव्होचा जीव, Shocking VIDEO

T20 World Cup : पोलार्डने मारला Bullet Shot, शेवटच्या सामन्यात थोडक्यात वाचला ब्राव्होचा जीव, Shocking VIDEO

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सर्वाधिक दोन वेळा चॅम्पियन झालेल्या वेस्ट इंडिजची (West Indies) कामगिरी निराशाजनक झाली.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सर्वाधिक दोन वेळा चॅम्पियन झालेल्या वेस्ट इंडिजची (West Indies) कामगिरी निराशाजनक झाली.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सर्वाधिक दोन वेळा चॅम्पियन झालेल्या वेस्ट इंडिजची (West Indies) कामगिरी निराशाजनक झाली.

अबु धाबी, 6 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सर्वाधिक दोन वेळा चॅम्पियन झालेल्या वेस्ट इंडिजची (West Indies) कामगिरी निराशाजनक झाली. सेमी फायनलच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (West Indies vs Australia) 8 विकेटने पराभव झाला. सुपर-12 स्टेजमधल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 157 रन करता आले. डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नाबाद 89 रन आणि मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) 53 रनमुळे ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने या सामन्यात टॉस जिंकून वेस्ट इंडिजला पहिले बॅटिंगला पाठवलं. यानंतर वेस्ट इंडिजने सुरुवातीचे 5 बॅट्समन 91 रनच्या स्कोअरवरच गमावले होते, त्यामुळे त्यांचा लवकर ऑल आऊट होण्याची भीती होती. पण कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) एक बाजू सांभाळून धरली. शिमरन हेटमायर आऊट झाल्यानंतर आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) बॅटिंगसाठी मैदानात आला.

मिचेल मार्श इनिंगची 15 वी ओव्हर टाकण्यासाठी आला, तेव्हा पाचव्या बॉलला पोलार्डने खणखणीत स्ट्रेड ड्राईव्ह मारला. पोलार्डने मारलेला हा शॉट नॉन स्ट्रायकिंग एण्डला उभ्या असणाऱ्या ब्राव्होच्या दिशेने गेला. ब्राव्होनंही चपळता दाखवत बॅटमध्ये टाकली, अन्यथा बॉल ब्राव्होलच्या पोटाला लागला असता. पोलार्डने मारलेला शॉट एवढा पॉवरफूल होता, की त्याच्या हातातून बॅट खाली पडली.

ब्राव्होच्या हातातून बॅट पडली तरी दोघांनी एक रन काढली. ब्राव्होने मारलेला हा शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्राव्होने या सामन्यात 12 बॉल खेळून 10 रन केले. टी-20 आंतरराष्ट्रीयमधला ब्राव्होचा हा अखेरचा सामना होता. पोलार्डने 31 बॉलमध्ये 44 रनची खेळी केली, यात 4 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. आंद्रे रसेलने अखेरच्या दोन बॉलवर दोन सिक्स लगावल्या ज्यामुळे वेस्ट इंडिजला 157 रनपर्यंत मजल मारता आली.

First published:

Tags: T20 world cup, West indies