मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: युजवेंद्र चहलला डच्चू दिल्याने सेहवाग नाराज, BCCI कडे मागितलं स्पष्टीकरण

T20 World Cup: युजवेंद्र चहलला डच्चू दिल्याने सेहवाग नाराज, BCCI कडे मागितलं स्पष्टीकरण

चहलला न निवडण्याबाबत निवड समितीला जाब विचारण्यासाठी आता सेहवाग पुढे सरसावला आहे.

चहलला न निवडण्याबाबत निवड समितीला जाब विचारण्यासाठी आता सेहवाग पुढे सरसावला आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १८ सदस्यीय संघात युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी न दिल्यामुळे माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwa) बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागणार आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: टी-20 वर्ल्डकपसाठी (Indian Team for T20 World Cup) भारताचा संघ जाहिर झाला. मात्र, काही महत्त्वाच्या खेळाडूंना अनपेक्षितपणे डच्चू देण्यात आला आहे. या यादीत युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal is not playing T20 World Cup) याचेदेखील नाव आहे. निवड समितीच्या (BCCI) या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत अनेकांनी टीकादेखील केली होती. दरम्यान, माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag on Yuzvendra Chahal Selection) चहलच्या निवडीसाठी पुढे सरसावला आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या 18 सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह एकूण पाच फिरकी गोलंदांजांना संधी देण्यात आलीय. तर संघात चहलऐवजी फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चहर प्राधान्य देण्यात आलं आहे. निवड समितीच्या या निर्णयावर सेहवागने आपले मत मांडले. ‘चहल हा भारताच्या टी-20 संघातला महत्त्वाचा घटक आहे. मोक्याच्या क्षणी बळी घेण्यात तो तरबेज आहे. त्यामुळे त्याला भारताच्या टी-20 संघात स्थान मिळायला हवे होते. त्याला संघात न घेण्याबाबत निवड समितीने स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण चहल हा असा गोलंदाज आहे की त्याला बळी कसे घ्यायचे, याची जाण आहे. तसेच भारतासाठी त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असल्याचे सेहवागने म्हटले आहे. तसेच, सेहवागने चहलसोबत चहरच्या निवडीसंदर्भातही आपले मत मांडले.

हे वाचा-T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच, दिग्गज भारतीयाचा पत्ता कट

...म्हणून करण्यात आली चहरची निवड

अनुभवी चहलच्या जागी राहुलवर विश्वास का ठेवण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दिले आहे. 'आम्हाला वेगानं बॉल टाकू शकेल अशा लेग स्पिनरची गरज होती. आम्ही नुकतंच चहरला चांगल्या गतीने बॉल टाकताना पाहिलं होते. ते पाहून याच स्पिनरची आपल्याला गरज आहे, असं निवड समितीला वाटलं. चहल आणि राहुल यांच्या नावावर बराच विचार करण्यात आला. अखेर सर्वसंमतीने राहुलची निवड करण्यात आली. ' असल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे.

हे वाचा- VIDEO: पंतचा स्टंट पडला असता कार्तिकवर भारी! थोडक्यात टळला भयंकर अपघात

श्रीलंका दौऱ्यात मिळाली होती संधी

राहुल चहर आणि युजवेंद्र चहल हे दोघंही मागील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये 3 वन-डे आणि तितक्याच टी20 सामन्यांची मालिका झाली. चहल वन-डे मालिकेतील 2 सामने खेळला. यामध्ये त्यानं चांगली बॉलिंग करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. चहलनं पहिल्या टी 20 सामन्यात 1 विकेट घेतली होती. त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं उर्वरित 2 सामने खेळू शकला नाही. तर दुसरीकडं चहरनं 2 टी 20 आणि 1 वन-डे सामना खेळला. त्यानं 2 टी20 मध्ये 4 तर एकमेव वन-डेमध्ये 3 विकेट्स घेतल्या.

First published:
top videos

    Tags: T20 world cup, Virender sehwag, Yuzvendra Chahal