मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच, दिग्गज भारतीयाचा पत्ता कट

T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच, दिग्गज भारतीयाचा पत्ता कट

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) सध्या नव्या कोचच्या शोधात आहे.

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) सध्या नव्या कोचच्या शोधात आहे.

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) सध्या नव्या कोचच्या शोधात आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर : टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) सध्या नव्या कोचच्या शोधात आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि हेड कोच अनिल कुंबळे (Anil Kumble) याचंही नाव या पदाच्या शर्यतीमध्ये होतं. पण, बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांना प्रभावित करण्यात कुंबळेला अपयश आलं आहे, त्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी संपणाऱ्या वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट टीमला (Team India) पुन्हा एकदा विदेशी कोच मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज एजन्सी 'आएएनएस' नं दिलेल्या माहितीनुसार अनिल कुंबळे स्वत: देखील पुन्हा कोच होण्यासाठी उत्सुक नाही. बोर्डाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ' अनिल कुंबळे पुन्हा परत येण्यास उत्सुक नाही. तसंच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा अपवाद वगळता एकाही सदस्याला या नावात रस नाही.' टीम इंडियाचे जुने खेळाडू विराट कोहलीसह (Virat Kohli) काही जणांसोबत पुन्हा काम करावं लागेल, हे कुंबळेला माहिती आहे. गांगुली यांनी कुंबळेचं नाव सुचवलं होतं, पण बीसीसीआयचे अन्य सदस्य याबाबत अध्यक्षांशी सहमत नाहीत.

T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात बदल होणार! मुंबईच्या निर्णयानं चर्चेला जोर

'अनिल कुंबळे सध्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) या आयपीएल टीमचा कोच आहे. त्याचा कोच म्हणून रेकॉर्ड आकर्षक नाही. आयपीएलमध्ये पंजाबची अवस्था कशी आहे, हे तुम्ही पाहू शकता,' असं मत सूत्रांनी व्यक्त केलं आहे. टीम इंडियाचा आणखी एक दिग्गज बॅट्समन व्ही.व्ही.एस. लक्ष्मणलाही (VVS Laxman) हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे. अर्थात यासाठी आणखी एक महिना अवधी आहे. आगामी काळात बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. टीम इंडियाचा बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) देखील या पदासाठी अर्ज करु शकतो.

या महिला क्रिकेटरला भेटण्यासाठी पहाटे 5 वाजता गेला होता विराट कोहली; प्रपोजही केलं होतं, PHOTO आला समोर

अनिल कुंबळे यापूर्वी देखील टीम इंडियाचा कोच होता. मात्र, 2017 साली त्यानं कॅप्टन विराट कोहलीशी झालेल्या वादानंतर पदाचा राजीनामा दिला होता. 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पराभवानंतर हा वाद समोर आला होता. त्यानंतर रवी शास्त्रींच्या या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

First published:

Tags: Ravi shashtri, Team india