जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: पंतचा स्टंट पडला असता कार्तिकवर भारी! थोडक्यात टळला भयंकर अपघात, VIDEO

IPL 2021: पंतचा स्टंट पडला असता कार्तिकवर भारी! थोडक्यात टळला भयंकर अपघात, VIDEO

IPL 2021: पंतचा स्टंट पडला असता कार्तिकवर भारी! थोडक्यात टळला भयंकर अपघात, VIDEO

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात मंगळवारी झालेल्या मॅचच्या दरम्यान एक मोठा अपघात टळला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात मंगळवारी झालेल्या मॅचच्या दरम्यान एक मोठा अपघात टळला आहे. केकेआरचा विकेट किपर-बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Kartihik) या मॅचमध्ये दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात वाचला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कृतीमुळे कार्तिक धोक्यात आला होता. मात्र नशिबानं तो थोडक्यात वाचला. काय घडला प्रकार? दिल्लीच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी ऋषभ पंतनं इतक्या जोरात बॅच फिरवली की कार्तिक स्वत:ला वाचवण्यासाठी खाली पडला. मैदानावर घडलेला हा प्रकार पाहून केकेआरचा बॉलर वरुण चक्रवर्तीलाही धक्का बसला. वरुणच्या पहिल्या बॉलवर पंतला ड्राइव्ह मारायचा होता. पण, बॉल त्याच्या बॅटच्या खालच्या भागाला लागून स्टंपच्या दिशेनं जात होता.

जाहिरात

तो बॉल पकडण्यासाठी कार्तिक पुढे आला. त्याचवेळी पंतनं बॉल अडवण्यासाठी मागे न पाहताच जोरात बॅट फिरवली. पंतनं बॅट इतक्या जोरात फिरवली होती की कार्तिकला सावरण्याची संधी मिळाली नाही. सुदैवानं दोघांचंही नशीब चांगलं होतं. त्यामुळे पंचची बॅट कार्तिकच्या हेल्मेटजवळून गेली. या घटनेनंतर पंतनं लगेच कार्तिकची माफी मागितली. अश्विन-मॉर्गन यांच्यात मैदानातच झाली बाचाबाची; VIDEO होतोय VIRAL कोलकाता नाईट रायडर्सनं या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 3 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करत कोलकाताला विजयासाठी 128 रनचं लक्ष्य दिलं होतं. केकेआरनं हे लक्ष्य 10 बॉल आणि 3 विकेट्स राखून पार केलं. दिल्लीच्या पराभवाचा मुंबईला फटका बसला आहे. या मॅचमध्ये दिल्लीची टीम विजयी झाली असती तर मुंबई इंडियन्स पंजाबला पराभूत करत टॉप 4 मध्ये दाखल झाली असती, पण मॉर्गनच्या टीमनं जबरदस्त कामगिरी करत असं होऊ दिलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात