जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कुणाचा? टीम इंडियाच्या कोचचा खुलासा

T20 World Cup : रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कुणाचा? टीम इंडियाच्या कोचचा खुलासा

T20 World Cup : रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कुणाचा? टीम इंडियाच्या कोचचा खुलासा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 2 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ईशान किशनला (Ishan Kishan) ओपनिंगला पाठवून रोहित शर्माला (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवलं. टीम इंडियाचा हा निर्णय पुरता फसला, यानंतर या निर्णयावर अनेक दिग्गजांनी टीकाही केली. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याच्या या निर्णयावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी खुलासा केला आहे. टीमला वरच्या क्रमांकावर डावखुरा खेळाडू हवा होता, म्हणून इशान किशनला ओपनिंगला पाठवण्यात आल्याचं राठोड म्हणाले. ‘मॅचच्या आदल्या दिवशी रात्री सूर्यकुमार यादवची पाठ दुखायला लागली. तो खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नव्हता. त्याची जागा इशान किशन घेईल हे निश्चित होतं. इशानने ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. हा निर्णय संपूर्ण टीम प्रशासनाने घेतला होता. रोहित शर्माही या निर्णयाचा भाग होता. तोदेखील या चर्चेत सहभागी झाला होता,’ असं स्पष्टीकरण विक्रम राठोड यांनी केलं. ‘डावखुऱ्या बॅटरला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय रणनितीचा भाग होता. खालच्या फळीत आम्हाला इशान, ऋषभ आणि रविंद्र जडेजा हे तिन्ही डावखुरे खेळाडू नको होते,’ असं विक्रम राठोड यांनी सांगितलं. वर्ल्ड कपसाठी तुम्हाला 15 खेळाडूच निवडता येतात. भारतीय टीममध्ये पर्यायी खेळाडू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय टीम सध्या नेट रनरेटबद्दल विचार करत नाही. सगळ्यात पहिले आम्हाला विजय मिळवला पाहिजे, यानंतर नेट रनरेटचं समिकरण येईल, अशी प्रतिक्रिया राठोडनी दिली. ‘या खेळपट्टीवर एक-एक रन काढून स्ट्राईक बदलणं कठीण आहे, कारण खेळपट्टीची गती आणि उसळी असमान आहे. पण वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर तुम्हाला रन करण्याचे मार्ग शोधावे लागतील,’ असं वक्तव्य विक्रम राठोड यांनी केलं. अश्विन आणि राहुल चहरला संधी मिळेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा कोणीही या शर्यतीतून बाहेर नसल्याचं राठोड म्हणाले. रोहित तिसऱ्या क्रमांकावर का आला? टीम इंडियातली धक्कादायक Inside Story

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात