मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : रोहित तिसऱ्या क्रमांकावर का आला? टीम इंडियातली धक्कादायक Inside Story

T20 World Cup : रोहित तिसऱ्या क्रमांकावर का आला? टीम इंडियातली धक्कादायक Inside Story

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) सामना 8 विकेटने गमावला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) सामना 8 विकेटने गमावला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) सामना 8 विकेटने गमावला.

पुढे वाचा ...

दुबई, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) सामना 8 विकेटने गमावला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ईशान किशनला (Ishan Kishan) संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) टॉसवेळी सूर्यकुमार यादवऐवजी ईशान किशन खेळेल, असं सांगितलं. एवढंच सांगून विराट थांबला नाही तर ईशान ओपनिंगला येईल, असंही विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. कारण ईशान किशन ओपनिंगला आला, पण त्याच्याबरोबर रोहित शर्मा (Rohit Sharma) नाही तर केएल राहुल (KL Rahul) होता.

ईशान किशन आणि केएल राहुलची जोडी मैदानात आल्यानंतर कॉमेंट्री करत असलेले मुरली कार्तिक आणि सायमन डूल यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. विराटचा हा निर्णय फसल्याचं पुढच्या 17 बॉलमध्येच निष्पन्न झालं. कारण ट्रेन्ट बोल्टने ईशान किशनला 4 रनवर आऊट केलं. किशनची विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा बॅटिंगला आला. टीम इंडियाची सुरुवातीचीच रणनिती फसल्यानंतर सामन्यात पुनरागमन करणं कठीण झालं.

पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 110 रनच करता आले. किवी टीमने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 शतकं करणाऱ्या रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर का पाठवण्यात आलं? याबाबत आता नवी माहिती समोर येत आहे. महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही रणनिती का आखण्यात आली, याची माहिती दिली.

रोहित शर्मा डावखुरा स्विंग बॉलर ट्रेन्ट बोल्टचा (Trent Boult) सामना करू शकेल का? याबाबत विश्वास नसल्याचं टीमने रोहित शर्माला सूचित केल्याचं गावसकर म्हणाले.

'ईशान किशन हिट ऑर मिस खेळाडू आहे, त्याच्यासारख्या खेळाडूने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळावं. त्या क्रमांकावर बॅटिंग मिळाली तर ईशान किशन परिस्थितीनुसार खेळेल. ट्रेन्ट बोल्टच्या बॉलिंगसमोर तुला खेळता येईल का नाही? याबाबत आम्हाला विश्वास नाही, असं टीम मॅनेजमेंटने रोहितला सांगितलं,' असा धक्कादायक गौप्यस्फोट गावसकरांनी केला.

'एवढी वर्ष एखादा खेळाडू ठरलेल्या क्रमांकावर खेळतो, पण तुम्ही त्याची बॅटिंग ऑर्डर बदलता तेव्हा तो खेळाडूही आपल्यात क्षमता आहे का नाही, असा विचार करायला लागतो. ईशान किशनने 70 रन केले असते, तर सगळ्यांनी कौतुक केलं असतं. पण जेव्हा तुमची रणनिती फसते तेव्हा तुमच्यावर टीका होते,' अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.

टीम इंडियाला अपयशाची भीती वाटत होती का नाही, ते माहिती नाही पण बॅटिंग ऑर्डरमध्ये जे बदल करण्यात आले ते यशस्वी झाले नाहीत, असं गावसकर म्हणाले.

भारताचं भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती?

भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

First published:

Tags: Rohit sharma, Sunil gavaskar, T20 world cup, Virat kohli